- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहरातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक एटीएम केंद्रांची आणि केंद्राचा वापर करणाºया नागरिकांची सुरक्षा वाºयावर आहे. बँकांच्या शाखांजवळील एटीएम केंद्र वगळल्यास इतर एटीएम केंद्रांजवळ सुरक्षारक्षकही नसून, नागरिकांच्या आणि एटीएम केंद्राच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने सुरक्षा फक्त नावापुरतीच आहे, हे शहरात मागील काळात घडलेल्या काही घटनांवरून निष्पन्न झाले आहे.नवी मुंबई शहर हे २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाते. देशामधील विविध राज्यांतील नागरिक कामानिमित्त नवी मुंबई शहरात मोठ्या संख्येने वास्तव्य करीत आहेत. अत्याधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाºया शहरात राज्यात आणि देशात असलेल्या सर्वच बँकांच्या शाखा आणि नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने नवनवीन एटीएम सेंटर उघडण्यात आली आहेत. एटीएम मशिनमध्ये लाखोंच्या पटीने पैसे असतात, त्यामुळे ग्राहकांसह एटीएम सेंटरची सुरक्षा अधिक कडक असणे खूपच गरजेचे आहे; परंतु अनेक एटीएम सेंटरजवळ सुरक्षारक्षकही नाहीत, तसेच नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी एटीएम मशिन फोडणे, एटीएम मशिनमधून पैसे काढलेल्या नागरिकांची लूट करणे, एटीएम सेंटरमध्ये एटीएम कार्डची अदलाबदली करून ग्राहकांची फसवणूक होणे, असे अनेक प्रकार घडले असून या प्रकारानंतर संबंधित एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शहरात काही एटीएम सेंटर नागरिकांची वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी आहेत, त्यामुळे अशा एटीएम सेंटरमध्ये जाणाºया विशेष करून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वच एटीएम सेंटरमध्ये सतत सुरक्षारक्षक असणे आवश्यक असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने बँकांना ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत काहीच सोयर सुतक नसल्याचे चित्र समोर आले आहे.काही एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक तैनात आहेत; परंतु त्यांच्याकडे सुरक्षेसाठी कोणतेही शस्त्र नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षारक्षक चोरांचा सामना कसा करणार, हा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.जानेवारीत घडलेल्या घटना५ जानेवारी रोजी नेरु ळ रेल्वे स्थानकासमोरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशिनची चोरट्यांनी तोडफोड केली होती. या वेळी तपासात एटीएममधील कॅमेरे बंद असल्याचे निष्पन्न झाले होते. परिसरातील दुकानांबाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांचा आधार घेऊन पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.१0 जानेवारी रोजी पनवेलमध्ये एटीएम केंद्रात मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून एटीएम कार्ड बदलण्यात आले आणि १0 हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे.१५ जानेवारी रोजी कोपरखैरणे येथे एका खातेदाराची बनावट एटीएम कार्ड बनवून त्यांच्या खात्यामधील चार लाख ५0 हजार रु पये हडप केल्याची घटना घडली आहे. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अग्निसुरक्षा यंत्रणेकडे डोळेझाकएटीएम केंद्रात अग्निसुरक्षेची यंत्रणा सहज नजरेस पडेल अशा ठिकाणी असणे गरजेचे असताना अनेक एटीएम सेंटरमध्ये प्रत्यक्षात अग्निशमन यंत्रणा नसून अनेक ठिकाणच्या अग्निसुरक्षा यंत्रणा बंद पडल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विभागाची मदत उपलब्ध होईपर्यंत कोणतीही उपाययोजना करणे शक्य नाही.दरवाजा नादुरु स्तीमुळे भटक्या कुत्र्यांचे वास्तव्यएटीएम सेंटरमध्ये कार्डधारकालाच प्रवेश करता यावा, यासाठी एटीएम केंद्राच्या दरवाजाजवळ कार्ड स्वाइप करण्याची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे; परंतु अनेक एटीएम सेंटरजवळ बसविण्यात आलेल्या स्वाइप मशिन बंद आहेत. त्यामुळे या स्वाइप मशिनचा काहीही उपयोग होत नाही. अनेक एटीएम केंद्रांचे दरवाजा नादुरु स्त असल्याने उघडेच असतात. त्यामुळे या ठिकाणी भटके कुत्रे बसलेले दिसतात.
एटीएम केंद्रांची सुरक्षा वाऱ्यावर; ग्राहकांच्या सुरक्षेकडे बँकांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 3:03 AM