मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजाजन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:03 PM2021-08-11T23:03:41+5:302021-08-11T23:05:25+5:30

मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

Atrocity case against MNS Navi Mumbai city president Gajajan Kale | मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजाजन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजाजन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार

Next

नवी मुंबई : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

पती गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हंटले आहे. यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. अखेर बुधवारी रात्री काळे यांच्या पत्नीने नेरुळ पोलीस ठाण्यात पती गजानन काळे यांच्या विरोधात तक्रार केली. त्यानुसार अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात गजानन काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.

Web Title: Atrocity case against MNS Navi Mumbai city president Gajajan Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.