महाडमध्ये प्राचार्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By admin | Published: May 6, 2017 06:14 AM2017-05-06T06:14:35+5:302017-05-06T06:14:35+5:30
महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.
अरुण लहू काटकर असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. तो आंबेडकर महाविद्यालयात शिपाई या पदावर कार्यरत आहे. मात्र, जुलै २०१२ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत प्राचार्य डॉ. गुरव यांनी त्याच्याकडून शिपाई पदाच्या कामाव्यतिरिक्त झाडांना पाणी घालणे, खड्डे खोदणे, झाडे लावणे, स्वच्छतागृहे साफ करून घेणे, महाविद्यालयाची साफसफाई करून घेणे, आवारातील गवत मशिनच्या साहाय्याने कापायला लावणे, अशी कामे करून घेतल्याची त्याची तक्र ार आहे. या तक्र ारीनुसार डॉ. धनाजी गुरव यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या करीत आहेत.