अवैध वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर एटीएसचा छापा; पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 08:33 PM2018-03-14T20:33:31+5:302018-03-14T20:33:31+5:30
अवैध्यरित्या वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांवर नवी मुंबई एटीएसने छापा टाकून काल (दि.१३) रोजी अटक केली. पनवेल मधील जुई गावातून ही अटक करण्यात आलेली असून या बांगलादेशी नागरिकांची एटीएस अधिकारी कसू चौकशी करीत आहेत.
पनवेल : अवैध्यरित्या वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांवर नवी मुंबई एटीएसने छापा टाकून काल (दि.१३) रोजी अटक केली. पनवेल मधील जुई गावातून ही अटक करण्यात आलेली असून या बांगलादेशी नागरिकांची एटीएस अधिकारी कसू चौकशी करीत आहेत.
विशेष म्हणजे अनधिकृत रित्या स्थलांतरित झालेल्या या बांगलादेशी नागरिक कोणत्या उद्देशाने याठिकाणी वास्तव्यास होते. या छाप्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी २० ते ३८ वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे पाच पैकी चार आरोपीकडे भारतीय आधारकार्ड सापडले असल्याची धक्कादायक माहिती एटीएसचे अधिकारी शंकर इंदलकर यांनी दिली. या आरोपींची आम्ही कसून चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले .
विदेशी कायद्यान्वये या आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, या आरोपींना १७ मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे . देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अशाप्रकारे एटीएस मार्फत कारवाई केली जाते .