- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडकोच्या कार्मिक विभागावर कर्मचारी संघटनेने सोमवारी हल्लाबोल केला. मयूर आगवणे या सहायक विकास अधिकाऱ्याचा मानसिक छळ करून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत संतप्त कर्मचाऱ्यांनी कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका विद्या तांबवे आणि विकास अधिकारी भरत ठाकूर यांना जाब विचारला. इतकेच नव्हे, तर उडवाउडवीची उत्तरे देणाºया भरत ठाकूर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न यावेळी काही कर्मचाºयांनी केला. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाºयांसह शंभरपेक्षा अधिक कर्मचाºयांनी सीबीडी पोलीस ठाण्यात जाऊन भरत ठाकूर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
सिडकोच्या कार्मिक विभागात सहायक विकास अधिकारी मयूर आगवणे यांनी कार्यालयातील वरिष्ठांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. यासंदर्भात २0 मे रोजीच्या लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत सिडको एम्प्लॉईज युनियनने सोमवारी सकाळी कार्मिक विभागाच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात हल्लाबोल केला. कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका विद्या तांबवे यांना याबाबत जाब विचारण्यात आला. तसेच मयूर यांचे वरिष्ठ तसेच या विभागाचे विकास अधिकारी भरत ठाकूर यांच्याकडेही विचारणा करण्यात आली, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कर्मचारी आणखीनच संतप्त झाले. याच विभागात काम करणाºया अन्य कर्मचाºयांनीही ठाकूर यांच्याकडून आमचीही छळवणूक होत असल्याचा थेट आरोप यावेळी केला.
काही कर्मचाºयांनी आक्रमक पवित्रा घेत ठाकूर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. त्यानंतर सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सेक्रेटरी जे.टी. पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी सीबीडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे पीडित मयूर आगवणे यांना बोलावून सर्वांच्या समक्ष त्यांची साक्ष नोंदविण्याची विनंती केली. आपले वरिष्ठ अधिकारी भरत ठाकूर यांच्या जाचामुळेच आपण आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत आल्याचे मयूर यांनी पोलिसांना सांगितले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अन्य काही कर्मचाºयांनीसुद्धा भरत ठाकूर यांच्याविरोधात यावेळी तक्रार केल्याचे समजते.कोण आहे ठाकूर ?भरत ठाकूर हे सध्या सिडकोच्या कार्मिक विभागात विकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. आपल्या हाताखालील कर्मचाºयांना दुय्यम वागणूक देणे, टाकून बोलणे, कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कर्मचाºयांना थांबवून ठेवणे, कोणत्याही वेळी कार्यालयात बोलावून घेणे आदी त्यांच्याविरोधात तक्रारी आहेत. याअगोदर ठाकूर हे साडेबारा टक्के विभागात मुख्य सर्व्हेअर म्हणून कार्यरत होते. परंतु तेथेही त्यांच्या विरोधात तक्रारी वाढल्याने चार महिन्यापूर्वी त्यांची कार्मिक विभागात बदली करण्यात आली होती.भरत ठाकूर सक्तीच्या रजेवरसिडको आॅफिसर असोसिएशन व सिडको एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाºयांनी सोमवारी संध्याकाळी सिडकोच्या मुंबईतील निर्मल कार्यालयात जाऊन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची वेगवेगळी भेट घेऊन मयूर आगवणे प्रकरणात आपापली भूमिका स्पष्ट केली. तत्पूर्वी कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका विद्या तांबवे आणि भरत ठाकूर यांनी लोकेश चंद्र यांची भेट घेऊन याप्रकरणात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडीनंतर लोकेश चंद्र यांनी भरत ठाकूर यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे निर्देश दिल्याचे समजते. मंगळवारी या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल तयार करून तो पोलिसांना सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली.मेडिटेशनही प्रभावहीनअधिकारी व कर्मचाºयांच्या स्वास्थ्यासाठी सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी मेडिटेशन सत्र सुरू केले होते. अधिकारी व कर्मचाºयांत सुसंवाद निर्माण व्हावा, मानसिक स्वास्थ्य राखले जावे. त्या माध्यमातून अधिक सक्षमपणे आपले काम करता यावे, हा भाटिया यांचा यामागे उद्देश होता. परंतु अधिकारी व कर्मचाºयांच्या मानसिकतेवर मेडिटेशन सत्राचा कोणताही प्रभाव झाला नसल्याचे अधोरेखित झाले आहे.अहवालानंतरच कारवाईसिडकोचे सहायक विकास अधिकारी मयूर आगवणे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे, परंतु संबंधित अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ही बाब पुरेशी नाही. आरोप झालेली व्यक्ती शासकीय अधिकारी असल्याने संबंधित व्यवस्थापनाचा यासंदर्भातील चौकशी अहवाल आवश्यक ठरणार आहे. या प्रकरणात सिडको व्यवस्थापनाकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधित अधिकाºयांच्या विरोधात कारवाई करणे शक्य होईल, अशी भूमिका पोलिसांनी मांडली आहे.