नवी मुंबई : जुईनगर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मशिनचे लॉक तोडून खोललेल्या अवस्थेत असल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतरही बँकेकडून दोन दिवसांनी गुन्हा घडल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.जुईनगर सेक्टर २४ येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. एटीएम मशिनचे झाकन उघडे असून, ते खोलण्याचा प्रयत्न झाल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. यामुळे काही नागरिकांनी जवळच्याच स्टेट बँकेला याची माहिती दिली; परंतु दुरुस्तीसाठी मशिन खोलले असावे, अशी शक्यता वर्तवत त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. यानंतरही काहींनी चौकशी केल्यास एटीएम मशिन आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगून तिथल्या अधिकाºयांनी हात वर केले. तर गुन्हा घडल्याची बँकेचीच तक्रारच नसल्याने प्रकार कळूनही पोलिसांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर मंगळवारी सकाळी एटीएमशी संबंधित बँकेच्या अधिकाºयांनी मंगळवारी सकाळी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एटीएम मशिन फोडल्याचा प्रकार घडूनही, त्याची दोन दिवसांनी तक्रार दिल्याने स्टेट बॅँकेच्या भोंगळ कारभाराची चर्चा परिसरात सुरू आहे.मशिनच्या पुढच्या भागाचा दरवाजा फोडून त्यामधील रक्कम चोरीचा प्रयत्न झालेला आहे. विशेष म्हणजे, बँकेने एटीएम मशिनच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमलेला असतानाही, घटने वेळी तो कुठे होता? याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.>स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेच्या अधिकाºयांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार एटीएममधील व परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात असून सुरक्षारक्षकाचीही चौकशी सुरू आहे.- अशोक राजपुत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरुळ.
एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 2:42 AM