भररस्त्यात विषप्राशन करून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 01:30 AM2021-01-13T01:30:20+5:302021-01-13T01:30:41+5:30

तडफडणाऱ्या तरुणाला बघण्यासाठी गर्दी

Attempted suicide by poisoning | भररस्त्यात विषप्राशन करून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

भररस्त्यात विषप्राशन करून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई : घणसोली येथे भररस्त्यात तरुणाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. हा तरुण अर्धा तास रस्त्यावर तडफडत असताना नागरिकांनी  बघ्याची भूमिका घेतली. अखेर एका तरुणाने पोलिसांना कळवले असता पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

घणसोली गावाच्या प्रवेशमार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून आलेला एक तरुण तेथे थांबला होता. काही वेळातच तो कोसळल्याचे काही व्यक्तींनी पहिले. त्याच्या मदतीसाठी काही जण पुढे धावले असता, तेथे फिनाईलची बाटली पडल्याचे आढळले. त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. फिनाईल त्याच्या शरीरात गेल्याने तो पडलेल्या जागी तडफडत होता.  एका प्रत्यक्षदर्शीने याची माहिती रबाळे पोलिसांना दिली. त्यानुसार दोन पोलीस त्या ठिकाणी आले असता त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. मात्र ती वेळेवर न आल्याने व तरुणाची प्रकृती खालावू लागल्याने रिक्षातून त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्याच्याकडील बॅग तपासली असता त्यामध्ये त्याचे ओळखपत्र सापडले. यावरून त्याचे नाव लक्ष्मण पवार असून तो रेड बॉय सुरक्षा एजन्सीमार्फत सुरक्षारक्षकाची नोकरी करतो. मात्र त्याच्या राहण्याच्या ठिकाणाविषयी उशिरापर्यंत माहिती समोर आलेली नव्हती. शिवाय त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचादेखील उलगडा झालेला नाही.

Web Title: Attempted suicide by poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.