हिंदुस्थान होम्सच्या नेरेपाडा, विहिघर येथील जमिनीचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:17 AM2018-01-18T01:17:19+5:302018-01-18T01:17:21+5:30
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. या इमारती बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही
पनवेल : पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या होत आहेत. या इमारती बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. शेतजमिनीवर घराचे बांधकाम करून महसूल विभागाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडविला जात आहे. तालुक्यात कमी किमतीत घरे मिळवून देतो असे सांगून हजारो नागरिकांना बांधकाम व्यावसायिकांनी गंडा घातला आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल होवूनही या प्रकारात वाढच होताना दिसत आहे. नवीन पनवेल येथील हिंदुस्थान होम्स प्रा. लि. या बांधकाम व्यावसायिकाने घर न देता फसवणूक केल्याप्रकरणी १५ ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंच अलिबाग येथे तक्र ार केली होती. त्यानुसार हिंदुस्थान होम्स प्रा.लि. यांच्या मालकीची व ताब्यात असलेली नेरे व विहिघरची ६२ गुंठे जमीन थकबाकीपोटी जप्त करून तिचा लिलाव करण्यात आला.
पनवेल तालुक्यात स्वत:ला बांधकाम व्यावसायिक म्हणवून घेणाºयांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. नवीन पनवेल येथे बांधकाम व्यावसायिकाचे दुकान मांडून बसलेले विजय गुप्ता यांनी विहिघर व नेरेपाडा येथे इमारत बांधून देतो असे सांगून पैसे घेतले, मात्र रूम न दिल्याच्या कारणावरून अस्मिता खांबे, अच्छेलाल यादव, नवनाथ भालेराव, विजय पवार, दत्तात्रेय कांबळे, तब्बसुम कुरेशी, ललित नाखरेकर, लता पाटील, शरद गांगुर्डे, गणेश खानविलकर, परशुराम कदम, कृष्णा वाठारकर, नंदिनी सावंत, बाळकृष्ण देवरे, नम्रता गिजे या पंधरा ग्राहकांची १ कोटी २७ लाख ३९ हजार ४०३ रु पयांची फसवणूक केली. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी रायगड जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंच, अलिबाग येथे तक्र ार केली. त्यानुसार ग्राहक तक्र ार निवारण मंचाने १ कोटी २७ लाख ३९ हजार ४०३ रु पयांची रक्कम वसूल करण्यासाठी आदेश दिला होता. त्यानुसार पनवेल तहसील विभागातर्फे१७ जानेवारी रोजी हिंदुस्थान होम्सच्या नावे असलेली नेरेपाडा व विहिघर येथील ६२ गुंठे जागेचा लिलाव करण्यात आला. या लिलाव प्रक्रि येत ६ नागरिकांनी सहभाग घेतला होता. ४३ लाख २९ हजार ५३५ रु पयांपासून जमिनीची बोली करण्यात आली व शेवटी १ कोटी ६८ लाख रु पयापर्यंत येऊन थांबली. पनवेल तालुक्यात पहिल्यांदाच असा लिलाव झाला असल्याची माहिती नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी दिली. नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकांच्या भूलथापांना फसू नये, तसेच घर घेताना कागदपत्रे तपासून घ्यावीत, असे आवाहन नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी केले आहे.