'कर' न भरलेल्या वाहनांचा आरटीओतर्फे लिलाव, इच्छूकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
By योगेश पिंगळे | Published: September 2, 2022 06:41 PM2022-09-02T18:41:24+5:302022-09-02T18:42:10+5:30
जप्त करण्यात आलेल्या पर्यटन कार वाहनांच्या मालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी कर भरलेला नाही. अशा वाहनांचा ई-लिलाव पद्धतीने जाहिर लिलाव करण्यात येत आहे
नवी मुंबई :- मुंबई मोटार वाहन अधिनियमांतर्गत मोटार वाहन कर न भरलेली वाहने जप्त करण्यात आली असून नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात जप्त करण्यात आलेल्या पर्यटन कार वाहनांचा जाहीर लिलाव १२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे होणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या पर्यटन कार वाहनांच्या मालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी कर भरलेला नाही. अशा वाहनांचा ई-लिलाव पद्धतीने जाहिर लिलाव करण्यात येत आहे. थकीतदारांना लिलावाच्या तारखेपर्यंत कर भरण्याची संधी राहील. लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यालयाच्या सूचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आलेली आहे. इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कृषि उत्पन्न बाजार समिती धान्य मार्केट, सेक्टर १९ या ठिकाणी करता येईल. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी सदर कार्यालयाशी संपर्क साधावा. लिलावाच्या अटी लिलावाच्या अगोदर ऑनलाईन प्रसिध्द करण्यात येणार असून इच्छुक व्यक्तींनी भाग घ्यावा असे आवाहन नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले आहे.