नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटच्या लिलावगृहात बटाटा सडला आहे. सडलेल्या मालाच्या दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांसह कामगार त्रस्त झाले असून मार्केटमध्ये साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांदा - बटाटा मार्केटमध्ये खराब हवामानामुळे माल खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. खराब झालेला माल व्यापारी लिलावगृहात टाकत आहेत. लिलावगृहाच्या एका कोपऱ्यामध्ये १०० पेक्षा जास्त गोण्यांमधील बटाटा सडला असून त्यामधून पाणी येवू लागले आहे. पूर्ण मार्केटमध्ये प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. सकाळी मार्केटमध्ये आल्यानंतर बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड झाले होते. नाकाला रुमाल लावून दिवसभर वावरावे लागत होते. सायंकाळपर्यंत सडलेला माल उचलण्यात आला नव्हता. दुर्गंधीमुळे मार्केटमध्ये साथीचे आजार पसरण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. येथील ओम कांदा बटाटा अडत व्यापारी संघटनेने बाजार समिती प्रशासनाच्या सदर गोष्ट निदर्शनास आणून दिली होती. सकाळी मार्केट सुरू होताच याविषयी माहिती दिल्यानंतरही दुपारपर्यंत काहीही कार्यवाही झालेली नव्हती. वारंवार अशाप्रकारच्या घटना होत असून लिलावगृहात व्यवसाय करणे अवघड होत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सडलेल्या बटाट्यामुळे लिलावगृहात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. येथील व्यापारी व कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार अशाप्रकारच्या घटना होत असून प्रशासन वेळेवर सडलेला माल उचलत नसल्यामुळे त्याचा त्रास इतरांना होत आहे. - सुरेश शिंदे, सचिव, व्यापारी संघ
लिलावगृहातील बटाटा सडला
By admin | Published: July 28, 2015 10:45 PM