बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकाऱ्यांच्या वारसांचा गौरव
By admin | Published: May 15, 2017 12:51 AM2017-05-15T00:51:22+5:302017-05-15T00:51:22+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून, मालाडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून, मालाडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात, डॉ. आंबेडकर यांच्या सहकारी वारसांचा गौरव करण्यात आला. भारतीय संविधान इंग्रजी आणि मराठीत तोंडपाठ असलेली भारतीय संविधान कन्या मनश्री आंबेतकर आणि आंबेडकरांच्या सहवासातील वारसांना शोधून त्यांच्यांवर लिखाण करणारे लेखक योगीराज बागुल, डॉ. बाबासाहेब बेडकर यांचे ग्रंथपाल म्हणून काम पाहणारे शांताराम रेगे यांचे वारस उमेश रेगे यांचा या वेळी गौरव करण्यात आला.
डॉ. आंबेडकर यांच्या सहकार्यात असलेले वारसामधील ना. म. जोशी, दादासाहेब दोंदे, राव बहादूर केशवराव बोले, सुरबानाना टिपणीस, भाई अनंत चित्रे, शां. शं. रेगे, बाबुजी कवळी, श्रीधरपंत टिळक, नाना पाटील, सीताराम जोशी, दत्तात्रय प्रधान, अनंत काणेकर, फत्तेलाल खान, दगडूशेठ भिलारे, चंद्रकांत अधिकारी, विनायक गणपत राव, बाळ साठे, केळुस्कर गुरुजी, केशव सीताराम ठाकरे, तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज, हैद्राबादचे निजाम यांच्याशी संबंधित आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, समितीचे मार्गदर्शक आणि अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्यासह माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये या वेळी उपस्थित होते.