उरण : द्रोणागिरी नोडमधील एपीएम टर्मिनल (मर्स्क) व्यवस्थापनाने येथील प्रकल्पाला स्वत:हून टाळे ठोकले आहे. त्यामुळे येथे काम करणा-या कंत्राटी कामगारांसह सुमारे ५०० कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.द्रोणागिरी नोडमधील एपीएम (मर्स्क) कंपनीचे कंटेनर टर्मिनल आहे. बहुराष्टÑीय कंपन्यांची कंटेनर हाताळणी व इतर कामे ठेकेदारी पद्धतीने दिली आहेत. पर्ल फ्रेंट्स सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीकडे असलेल्या कंत्राटी कामात १८७ कामगार होते. डीपीडी धोरणामुळे एपीएम कंटेनर टर्मिनलमध्ये कंटेनर हाताळणीचे काम कमी झाले आहे. कामगारांच्या असहकारामुळे कंपनीला दुसºया माथाडी कामगारांकडून काम करून घ्यावे लागत होते. त्यामुळे आर्थिक उत्पन्नावरही परिणाम झाला होता. कंपनीने कामगार कपातीचे धोरण अवलंबल्याचे आरोप कामगार संघटनांकडून केले जात आहेत. त्यामुळे पर्ल फ्रेंट्स सर्व्हिसेस या ठेकेदारीवर काम करणाºया कंपनीने ९९ कामगारांना कमी केले. त्याविरोधात २ फेब्रुवारीपासून येथे ठेकेदारीत काम करणाºया कामगारांनी आंदोलन केले. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे कंटेनर हाताळणीचे काम ठप्प झाले होते. त्यामुळे एपीएम टर्मिनल व्यवस्थापनाने ठेकेदारी पद्धतीवर काम करणाºया कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवीत ठेकेदार कंपनी पर्ल्स फे्रं ट्स सर्व्हिसेस कंपनीचे संचालक जमशेद अश्रफ यांनाच बुधवार, ७ फेब्रुवारीला नोटीस पाठवून संप १२ तासांत मागे घ्यावा. अन्यथा कंत्राट रद्द करण्याचा इशारा मर्स्क व्यवस्थापनाने दिला. त्यानंतरही कामगारांनी संप सुरूच ठेवला. गुरुवारीला टर्मिनलमध्ये आलेल्या अधिकारी आणि आॅपरेटर कामगारांना गाड्या अडवून मारहाण केल्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला.मात्र कामगारांनी मारहाण केल्याचा कंपनीने केलेला आरोपही बिनबुडाचा असल्याचा दावा ट्रान्सपोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी श्रीराम यादव यांनी केला आहे.
मर्स्क कंपनीला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:08 AM