तीन शाळांना पुरस्कार प्रदान
By admin | Published: October 16, 2015 02:15 AM2015-10-16T02:15:54+5:302015-10-16T02:15:54+5:30
ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या राजिप प्राथमिक शाळा,
अलिबाग : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या राजिप प्राथमिक शाळा, तोंडसुरे (म्हसळा) या शाळेस प्रथम क्रमांकाचे १० हजार रुपये, राजिप शाळा, रानवडे (माणगांव) या शाळेस द्वितीय क्रमांकाचे ७ हजार ५०० रुपये तर राजिप शाळा, दिवील (पोलादपूर) या शाळेस ५ हजार रुपये, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असा पुरस्कार शिक्षण समितीच्या सभेत रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण, क्रीडा व आरोग्य समिती सभापती मनोहर पाशिलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा कापडेखुर्द यांना शिक्षण समिती सदस्या मीनाक्षी रणपिसे यांच्यातर्फे उत्तेजनार्थ २ हजार ५०० रुपये व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
७ जानेवारी २०१३ च्या शासन निर्णयान्वये रायगड जिल्ह्यात राबविण्यात हा कार्यक्रम राबविण्यात आला. शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमधून स्वयंमूल्यमापन करून त्याचा अहवाल तालुकास्तरावर संकलित केला. समितीने शाळांचे मूल्यमापन करून प्रथम तीन क्रमांकाच्या शाळांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे सादर केले. त्यामधून प्रथम १० शाळांचे जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीमार्फत झाले.