रक्तदान शिबिरातून नागरिकांमध्ये जनजागृती; रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:56 AM2020-07-03T01:56:07+5:302020-07-03T01:56:33+5:30
नेरूळमध्ये आयोजन : नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात झालेल्या या शिबिराला नवी मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रुग्णांना जीवनदान देण्यासाठी नियमित रक्तदान करण्याचा संकल्प त्यांनी केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून देशात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदान करण्याची भीती वाटू लागल्याने रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. रुग्णालयात जाऊन स्वेच्छेने रक्तदान करण्याचे प्रमाणही कमी झाले. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान चळवळ उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित केले होते. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात झालेल्या शिबिराचे उद्घाटन रुग्णालयाचे सीईओ डॉ. राहुल पेद्दावाड यांच्या हस्ते झाले. पेद्दावाड यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले. सद्य:स्थितीमध्ये सर्वच रुग्णालयांमध्ये रक्ताची गरज आहे. नागरिक रक्तदान करण्यासाठी पुढे आल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. कोरोना काळात रक्तदान केल्याने दात्यांना काहीही धोका नाही. यामुळे ‘लोकमत’ने सुरू केलेली जनजागृती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रक्तदान शिबिरामध्ये सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. मास्क, सॅनिटायझरचा वापर व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. शिबिरास शहरवासीयांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, मनुष्यबळ विकास अधिकारी सचिन लिगाडे, विनोद भांडारकर, रोनाल्ड डिसुझा, दत्ता घंगाळे, महेश कोठीवाले, अमर पाटील, रक्तपेढीमधील डॉ. सीमा गुप्ता, प्रसाद कुलकर्णी, सुनीता शिंदे, राजेश पाटील, मनीषा डोरके, शोभा वैती, पूजा नलावडे, पूनम जगताप, सुनीता राजुरी, पिंकी गुप्ता, गंगाराम भदरगे, नेहा घाडगे आदी उपस्थित होते. सीमा नायर यांचेही विशेष सहकार्य लाभले.
रक्तदानाविषयी जनजागृतीचा संकल्प
नेरूळमध्ये झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये महादेव पवार, मनोज मेहेर, अक्षय काळे, मिलिंद मोटे, रवी इपली, रूपेश वाडकर, शिवलिंग शीलवंत, विनायक भोरे, अशोक चांदणे, चेतन कोरडे, संदीप खांडगे-पाटील, सस्मित भोईर, विजय तांडेल, हृषीकेश धोत्रे, सिद्धाराम शीलवंत, प्रसाद ठाकूर, दर्पण चिखले, सचिन सावंत, मधुरा करमरकर, अमेय करमरकर, हर्षल खैरे, स्वप्निल एडेकर, रोहन आंब्रे, मितेश नाईक, संदेश करपे, जयेश सावंत, आनंद कुडाळकर यांनी सहभाग घेतला आणि रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचा संकल्पही केला.