पर्यावरणपूरक दिवाळीसाठी नेरुळमध्ये जनजागृती मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:43 AM2019-10-26T00:43:38+5:302019-10-26T00:44:12+5:30
दुष्परिणामांची माहिती ; बोलक्या बाहुल्यांच्या खेळातून संदेश
नवी मुंबई : दिवाळी सण आनंदाचा, दिव्यांचा तसेच अंधारातून उजेडाकडे घेऊन जाणाऱ्या प्रकाशाचा म्हणून साजरा केला जातो. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जात असल्याने पशुपक्षांवर तसेच वातावरणावरही दुष्परिणाम होतो. हे टाळण्यासाठी नेरु ळ सेक्टर ४४ मधील पोतदार एज्युकेशन सोसायटीतर्फे अॅन्टी क्रॅ कर ड्राइव्ह सुरू करण्यात आले आहे. मोहिमेंतर्गत बोलक्या बाहुल्यांच्या खेळातून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश विविध शाळांमध्ये देण्यात येत आहे.
शाळेतील प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी अॅन्टी क्रॅ कर मोहम पोतदान एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका स्वाती पोपट वत्स यांच्या मार्गदर्शनानुसार राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी विद्यालयात बोलक्या बाहुल्यांचा खेळ सादर केला. खेळातून लहान मुलांना फटाक्यापासून होणाºया दुष्परिणामांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. फटाके फोडल्याने वायू, ध्वनी प्र्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे बोलक्या बाहुल्यांच्या खेळातून सांगण्यात आले.
फटाके फोडताना अनेकदा लहान मुले जखमी होतात. उच्च आवाजाच्या फटाक्यामुळे कानाचे पडदे बसण्याचे प्रकार घडतात. काही ज्येष्ठ नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढतात, असे अनेक दुष्परिणाम या बोलक्या बाहुल्यांच्या खेळातून मांडण्यात आले आहेत. सीवूड्समधील पोतदार इंनटनॅशल स्कूल व महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाची शाळा आणि उलवे येथील रेडक्लिप हायस्कूलमधील मुलांसमोर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना बॅच लावून फटाक्या विरोधातील मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले.