स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 02:47 AM2019-12-28T02:47:05+5:302019-12-28T02:47:22+5:30

सायकलवर १२० कि.मी. प्रवास : विविध गावांना भेट

Awareness to prevent female feticide | स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती

Next

वैभव गायकर

पनवेल : देशभरात महिलांवरील वाढते अत्याचार थांबावे, स्त्रीभ्रूणहत्या व पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी ठाणेमधील आठ वर्षांच्या सई पाटील या मुलीने जनजागृती सुरू केली आहे. कार्ला येथील एकवीरा देवी मंदिर ते ठाणे दरम्यान १२० किलोमीटर अंतर सायलवरून पूर्ण करत नागरिकांमध्ये जनजागृती केली.

एकवीरा देवी मंदिरापासून २५ डिसेंबरला सई पाटीलने प्रवासाला सुरु वात केली होती. तिचे वडील आशीष पाटील हेही सोबत होते. या प्रवासादरम्यान सईचे पनवेलकरांनी स्वागत केले. पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका चारु शीला घरत आदीसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिसऱ्या इयत्तेत शिकणाºया सईचे नौसेनेत जाण्याचे स्वप्न आहे. यापूर्वी सईने भिवंडी येथील कशेळी ब्रिटिशकालीन पुलावरून सुमारे ५० फूट उंचीवरून उडी घेत अनोखा विक्र म केला होता. याव्यतिरिक्त धरमतर ते गेटवे आॅफ इंडिया, उरण ते कासाचा खडक असा दहा कि.मी.चा प्रवास स्विमिंगद्वारे एका तासात पूर्ण केला होता. २१ व्या शतकातही आपल्या समाजात मुलगा-मुलगी हा भेद दिसून येतो.
मात्र, समाजातील ही मानसिकता बदलण्याचे आव्हान या मुलीने स्वीकारले आहे. स्त्रीभ्रूणहत्येविरोधात जनजागृती करत असताना प्रवासादरम्यान अनेक गावांना भेट देत गावकऱ्यांमध्ये भ्रूणहत्येविरोधात जनजागृती सईने केली.
 

Web Title: Awareness to prevent female feticide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.