कोरोनाग्रस्तांसाठी आयुर्वेद तज्ज्ञ सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:36 AM2020-07-31T00:36:08+5:302020-07-31T00:36:13+5:30
रुग्णांना होणार फायदा : आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषध, आहार, विहार त्रिसूत्रीचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेलमधील कोरोना पॉझिटिव्ह अल्प व मध्यम स्वरूपाच्या लक्षणांचा प्रादुर्भाव असणाऱ्या रुग्णांना उपचार देण्यासाठी पनवेलमधील आयुर्वेद तज्ज्ञ पुढे सरसावले आहेत. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषध आहार, विहार या त्रिसूत्रीचा वापर करून आयुर्वेदिक उपचाराने कोविडच्या अनेक रुग्णांना फायदा होईल, असा विश्वास आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाने कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुष टास्कफोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्समध्ये पनवेलमधील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अमित दवे सक्रिय सदस्य आहेत. या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधात्मक उपाय, अलाक्षणिक व अल्प लाक्षणिक रुग्णांना वैकल्पिक आयुष उपचार देण्याची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार आता पनवेलमधील १५ आयुर्वेदिक वैद्यांच्या टीमला इंडिया बुल्स व देवांशी इन येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना शासनाच्या अधिसूचनेत समाविष्ट औषधांचे रुग्णाच्या संमतीने उपचार करण्यास पनवेल महानगरपालिकेने परवानगी दिली आहे.
सदर उपचारांसाठी लागणारी औषधे पनवेलमधील श्री धुतपापेश्वर लिमिटेड, पनवेल आणि दवे आयुर्वेद भवन ह्यांच्यामार्फत उपलब्ध केली गेली आहेत. डॉक्टर आपल्या पदरचे पैसे वापरून कोविड रुग्णांची विनामूल्य सेवा करीत आहेत. समाजातील सर्व थरातून ह्या आयुर्वेदिक डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
या चिकित्सा उपक्रमात डॉ. सुभाष जैन, डॉ. आशिष ठाकूर, डॉ. सुमुख नाईक, डॉ. समीक्षा नवरीकर, डॉ. अमृता नाईक, डॉ. अमित दवे, डॉ. गौरव दवे तसेच पनवेल परिसरातील इतर आयुर्वेद तज्ज्ञ कोविड योद्धा म्हणून सहभागी आहेत.
च्गेला एक आठवडा हे आयुर्वेद तज्ज्ञ स्वत: डॉनिंग आणि डॉफिंग करून प्रत्यक्षात रुग्ण तपासणी करीत आहेत व त्यांना १० दिवसांची आयुर्वेदिक औषधे देऊन त्याचा रोज फॉलोअप व नोंद ठेवत आहेत.
च् एका आठवड्यातच अल्प लक्षणे असणाºया रुग्णांमध्ये सकारात्मक बदल दिसत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ वैद्यांनी केले आहे.