शहरवासीयांचे स्वप्न साकार, चित्रफितीमधून उलगडणार बाबासाहेबांचा जीवनपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:22 AM2018-04-14T03:22:25+5:302018-04-14T03:22:25+5:30

ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जयंती उत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न अखेर ७ वर्षांनंतर पूर्ण होणार आहे.

Babasaheb's life span will expose the dreams of the residents of the city | शहरवासीयांचे स्वप्न साकार, चित्रफितीमधून उलगडणार बाबासाहेबांचा जीवनपट

शहरवासीयांचे स्वप्न साकार, चित्रफितीमधून उलगडणार बाबासाहेबांचा जीवनपट

googlenewsNext

नवी मुंबई : ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जयंती उत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न अखेर ७ वर्षांनंतर पूर्ण होणार आहे. पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच जयंती उत्सव स्मारकामध्ये साजरा करण्यात येणार आहे. या वेळी भीमगीतांसह बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखविणारी चित्रफीत व चवदार तळ्यावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. ५ एप्रिल २०१३मध्ये काम पूर्ण करून आंबेडकर जयंतीला स्मारकाचे लोकार्पण करण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु विविध कारणांनी स्मारकाचे काम रखडले.
जयंती जवळ आली की उद्घाटनाच्या नवीन तारखा जाहीर केल्या जाऊ लागल्या. काम सुरू होऊन सात वषे झाल्यानंतरही अद्याप पूर्ण काम होऊ शकलेले नाही. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १ नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात आले. यामुळे यावर्षी जयंती उत्सव स्मारकामध्ये करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शनिवारी सकाळी १० वाजता जयंती उत्सव होणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित परशुराम कोळी निर्मित भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने जीवनपटावर आधारित चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. महाड येथील चवदार तळ्यावरील सत्याग्रह या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थुल तसेच छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, बुलढाणा येथील प्राचार्य डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे उपस्थित राहणार आहेत.
महापौर जयवंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कायक्रमप्रसंगी महापालिका पदाधिकारी, उपस्थित राहणार आहेत. कला, क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया ५५ लाभार्थी विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये रकमेची विशेष शिष्यवृत्ती वितरीत केली जाणार आहे. नवी मंबईमधील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
>लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जयंती उत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न अखेर ७ वर्षांनंतर पूर्ण होणार आहे. पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच जयंती उत्सव स्मारकामध्ये साजरा करण्यात येणार आहे. या वेळी भीमगीतांसह बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखविणारी चित्रफीत व चवदार तळ्यावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. ५ एप्रिल २०१३मध्ये काम पूर्ण करून आंबेडकर जयंतीला स्मारकाचे लोकार्पण करण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु विविध कारणांनी स्मारकाचे काम रखडले.
जयंती जवळ आली की उद्घाटनाच्या नवीन तारखा जाहीर केल्या जाऊ लागल्या. काम सुरू होऊन सात वषे झाल्यानंतरही अद्याप पूर्ण काम होऊ शकलेले नाही. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १ नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात आले. यामुळे यावर्षी जयंती उत्सव स्मारकामध्ये करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शनिवारी सकाळी १० वाजता जयंती उत्सव होणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित परशुराम कोळी निर्मित भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने जीवनपटावर आधारित चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. महाड येथील चवदार तळ्यावरील सत्याग्रह या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थुल तसेच छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, बुलढाणा येथील प्राचार्य डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे उपस्थित राहणार आहेत.
महापौर जयवंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या कायक्रमप्रसंगी महापालिका पदाधिकारी, उपस्थित राहणार आहेत. कला, क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया ५५ लाभार्थी विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये रकमेची विशेष शिष्यवृत्ती वितरीत केली जाणार आहे. नवी मंबईमधील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
>आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टी
भूखंडाचे क्षेत्रफळ
५७५० चौरस मीटर
बांधकाम क्षेत्रफळ
२३१० चौरस मीटर
मुख्य हॉल - ३०० चौ.मीटर
कॉन्फरन्स रूम - ३७ चौ.मीटर
सर्विस एरिया - १७२ चौ.मीटर
व्हीआयपी रूम व कार्यालय
- ६४ चौ.मीटर
पोडियम गार्डन - ८२५ चौ.मीटर
खुले सभागृह - ८५६ चौ.मीटर
प्रार्थना हॉल - ३२५ चौ.मीटर
वस्तुसंग्रहालय - २६४ चौ.मीटर
कलादालन - १३४ चौ.मीटर
कॅफेटेरिया - ११४ चौ.मीटर
वाचनालय - ११४ चौ.मीटर
वॉटर बॉडी - २७५ चौ.मीटर
डोम - ४९ मीटर उंच

Web Title: Babasaheb's life span will expose the dreams of the residents of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.