नवी मुंबई : श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणा-या सिडकोने वरिष्ठ अधिकाºयांवर निवासस्थानाच्या नावाखाली सदनिकांची खैरात केली आहे. एनआरआय येथे राखून ठेवलेल्या दोन प्रशस्त सदनिकांपैकी एक आपल्या वरिष्ठ महिला अधिका-याला, तर दुसरी त्यांच्या नोकराला राहण्यासाठी दिली आहे.वरिष्ठ अधिकाºयांसाठी सिडकोने शहरात काही सदनिका राखून ठेवल्या आहेत. शासकीय निवासस्थान नसलेल्या सिडकोच्या वरिष्ठ अधिकाºयांना या सदनिका राहण्यासाठी दिल्या जातात. तर किल्ले गावठाण येथे सिडकोचे गेस्ट हाउस आहे. यात एकूण तीन सूट असून त्यापैकी १ क्रमांकाचे सूट सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांसाठी आहे. तर दोन क्रमांकाचे सूट आय.ए.एस. अधिकाºयांसाठी राखून ठेवले आहे. तीन क्रमांकाच्या सूटमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे वास्तव्य आहे. याशिवाय एनआरआय फेज-१ आणि फेज-२ मध्ये अधिकाºयांच्या निवासस्थानासाठी सहा सदनिका राखून ठेवल्या आहेत. तसेच उरण फाटा येथे पंचशील सोसायटीत गेस्ट हाउस म्हणून सिडकोचे पाच बंगले आहेत. मुंबई किंवा जवळच्या शहरात स्वत:च्या नावावर शासकीय निवासस्थान नसलेल्या सिडकोच्या वरिष्ठ अधिकाºयांना या सदनिका उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानुसार एनआरआय (फेज-२)मधील इमारत क्रमांक ५४मधील १७०१ क्रमांकाची सदनिका सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांना राहण्यासाठी दिली आहे. तर इमारत क्रमांक ५५मधील ३०४ क्रमांकाच्या सदनिकेत सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा या राहतात. विशेष म्हणजे, याच इमारतीतील ३०१ क्रमांकाचे प्रशस्त घर त्यांच्या नोकराला राहण्यासाठी दिले आहे. वरिष्ठ अधिकाºयाच्या नोकरासाठी सिडकोने दाखविलेल्या या औदार्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सिडकोकडील तपशील गायबसिडकोने आय.ए.एस. अधिकाºयांसाठी सीवूड येथे वनश्री आणि खारघरमध्ये वसुंधरा गृहसंकुल उभारले आहे. या गृहसंकुलात आजी-माजी आय.ए.एस. अधिकाºयांची निवासस्थाने आहेत. मध्यंतरीच्या काळात हे गृहसंकुल चौकशीच्या फेºयात अडकले होते. त्याचा धसका घेत सिडकोने आपल्या दप्तरी नोंद असलेल्या या गृहसंकुलातील सदनिकाधारकांच्या नावांची यादी व तपशील गायब केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.गेस्ट हाउसच्या जिमवर उधळपट्टीकिल्ले गावठाण येथे असलेल्या सिडको गेस्ट हाउसमध्ये दोन-अडीच लाख रुपये खर्च करून आलिशान जिम तयार करण्यात आली आहे. सनदी अधिकारी सुनील केंद्रीकर यांच्या सांगण्यावरून ही जिम तयार करण्यात आली होते. विशेष म्हणजे, केंद्रीकर यांच्याकडे प्रशासन विभागाचा कार्यभार होता. त्या काळात ते महिन्यातून तीन ते चार दिवस सिडकोत यायचे. या काळात त्यांनी ही जिम तयार करून घेतली होती. त्यांची बदली झाल्यानंतर ही जिम वापराविना धूळखात पडून आहे.
वरिष्ठ अधिका-यांवर निवासस्थानांची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 7:07 AM