आॅनलाइनमुळे उडाली भंबेरी

By admin | Published: February 10, 2017 04:25 AM2017-02-10T04:25:18+5:302017-02-10T04:25:18+5:30

गेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत कर्जत तालुक्यात पाच गट व दहा गण होते. या वेळी प्रभाग रचनेनंतर कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्रभाग सहा झाले

Bamboo flown by online | आॅनलाइनमुळे उडाली भंबेरी

आॅनलाइनमुळे उडाली भंबेरी

Next

कर्जत : गेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत कर्जत तालुक्यात पाच गट व दहा गण होते. या वेळी प्रभाग रचनेनंतर कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्रभाग सहा झाले व पंचायत समितीचे प्रभाग बारा झाले. पहिल्यांदाच आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरू झाल्याने अनेकांची भंबेरी उडाली. त्यातच उमेदवारांची संख्या वाढल्याने ए.बी. फॉर्म मिळविण्यासाठी त्यांची एकच घाई झालेली दिसली. या गडबडीत काही जणांना उमेदवारी मिळूनही पक्षाचे चिन्ह मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नावाने बोटे मोडण्यापलीकडे काही करता आले नाही. अनेक उमेदवारी न मिळालेले उमेदवार अन्य पक्षाच्या सानिध्यात आहेत.
जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागा अशा एकूण अठरा जागांसाठी १२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पडताळणीमध्ये १११ अर्ज वैध ठरले. स्वत:चा गट आरक्षणामुळे राखीव झाल्याने अनेकांची पंचाईत झाली. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांनी कळंब गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आघाडी व युतीमध्येही जागावाटपामुळे नाराजी आहे. शिवसेना-कॉँग्रेस युतीतही फाटाफूट होण्याची शक्यता आहे. भाजपा-आरपीआय युती झाली. आरपीआयने केवळ एका गणातच उमेदवारी अर्ज भरला आहे; परंतु ए.बी.फॉर्म वेळेत न दिल्याने निशाणी मिळणार नसल्याने पुरस्कृत उमेदवारीवर समाधान मानावे लागणार आहे. पूर्वी या तालुक्यात कॉँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु या निवडणुकीत एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समितीमध्ये उमेदवार उभे केले आहेत. या उलट विद्यमान पंचायत समितीमध्ये केवळ एकच सदस्य असताना या निवडणुकीत भाजपाने आरपीआयशी युती करून सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना बहुतेक स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे दिसत आहे. मनसेनेही दोन-तीन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी-शेतकरी कामगार पक्ष-स्वाभिमानी आरपीआय आघाडीमध्ये एक-दोन अपवाद वगळता सर्व काही ठीक आहे असे दिसते. विशेष म्हणजे, एमएमआयने शेलू गणात उमेदवार उभा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १ लाख ३१ हजार १३१ मतदार आहेत, तेव्हा या मतदारराजावरच उमेदवारांचे भविष्य अवलंबून आहे. (वार्ताहर)



1पंचायत समितीच्या पोशिर गणात १० हजार २२४ मतदारांपैकी ५ हजार ३१९ पुरु ष आणि ४ हजार ९०५ महिला उमेदवार आहेत.
2कळंब गणात ११ हजार ९०९ मतदार आहेत, त्यामध्ये ६ हजार २४५ पुरु ष, तर ५ हजार ६६४ महिला मतदार आहेत.
3पाथरज गणात १२ हजार ४३३ मतदार त्यापैकी ६ हजार ५१८ मतदार पुरु ष आहेत, तर ५ हजार ९१५ मतदार महिला आहेत.
4कशेळे पंचायत समिती गणात १० हजार ९९९ मतदार आहेत, त्यामध्ये ५ हजार ६७४ पुरु ष आणि ५३२५ महिला मतदार आहेत.
5दहिवली गटातील ९ हजार ५७५ मतदारांपैकी ४ हजार ९९४ पुरु ष, तर ४ हजार ५७८ महिला मतदार आहेत.
6उमरोली पंचायत समिती गणात ११ हजार १०२ मतदार आहेत. त्यापैकी ५ हजार ६३४ पुरु ष, तर ५ हजार ४६८ महिला मतदार.
7नेरळ पंचायत समिती गणात १२ हजार ९४२ मतदार असून, ६ हजार ५९६ मतदार पुरु ष आणि ६ हजार ३४६ मतदार महिला आहेत.
8शेलू पंचायत समिती गणात ७ हजार ९१६ मतदार असून, ४ हजार ६९ मतदार पुरु ष, तर ३ हजार ८४७ महिला मतदार आहेत.
9पिंपळोली पंचायत समिती गणात १० हजार ३५६ मतदार, त्यातील ५ हजार ५०५ मतदार पुरु ष आणि ५ हजार ८५१ महिला मतदार.
10सावेले पंचायत समिती गणात ११ हजार ७७९ मतदार असून, ६ हजार २१ मतदार पुरु ष व ५ हजार ७६० महिला मतदार.
11वेणगाव पंचायत समिती गणात १० हजार १२७ मतदार असून, ५ हजार १३० मतदार पुरु ष असून ४ हजार ९५७ मतदार महिला.
12बीड बुद्रुक गणात ११ हजार ८०० मतदार असून, सहा हजार १३८ पुरु ष मतदार असून महिला मतदार ५ हजार ६६२ आहेत.

Web Title: Bamboo flown by online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.