नवी मुंबई : नेरूळ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरसेवक किंवा विभाग कार्यालयातून पत्र आणण्याची सक्ती केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याविषयी काँगे्रसने आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. सेक्टर ४ मध्ये राहणाऱ्या एक महिलेचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मृतदेह अंत्यविधीसाठी सेक्टर २ मधील स्मशानभूमीमध्ये नेण्यात आला. त्या ठिकाणी नातेवाइकांना नगरसेवक किंवा महापालिकेच्या विभाग कार्यालयातून पत्र आणण्याच्या सूचना करण्यात आल्या. काँगे्रसचे रोजगार व स्वयंरोजगार सेलचे रवींद्र सावंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याविषयी आक्षेप नोंदविला. डॉक्टरकडून ४ ए अर्ज भरून घेणे आवश्यक असते. डॉक्टरकडे अर्ज न मिळाल्यास तो विभाग कार्यालयातून मिळतो. परंतु या व्यतिरिक्त नगरसेवकांच्या पत्राची मागणी करणे नियमबाह्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
अंत्यविधीसाठी केली अडवणूक
By admin | Published: July 13, 2015 11:34 PM