- मयूर तांबडेपनवेल : तालुका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बांगलादेशी नागरिकाला चिखले येथून अटक केली होती. पोलिसांना त्याच्याकडे बोगस नावाने रेशन कार्ड, लायसन्स, आधार कार्ड, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय, अधिवास दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र आदी कागदपत्रे सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.सामान्य माणसाला शासकीय दाखले किंवा रेशन कार्ड बनवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अनेकदा पायऱ्या झिजवाव्या लागतात. दाखले बनवण्यासाठी महिना महिना फेºया माराव्या लागतात. मात्र, बांगलादेशातून घुसखोरी करून पनवेलमध्ये राहत असलेल्या या नागरिकांना काही पैसे मोजून सहज शासकीय दाखले उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे.चिखले गावातून तालुका पोलिसांनी एका बांगलादेशीला २३ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. इनामूल उमर मुल्ला (फरीदपूर, बांगलादेश) असे याचे खरे नाव असून, तो मनोहर पवार (चिखले) या खोट्या नावाने वास्तव्य करत होता. त्याच्याकडे बनावट नावाचे शासकीय दाखले आढळल्याने पोलिसांकडूनही आश्चर्य व्यक्त होत आहे. भारतात राहणाºया नागरिकांकडे जेवढी कागदपत्रे नसतील, त्यापेक्षा अधिक शासकीय दाखले बेकायदेशीर वास्तव्य करणाºया या बांगलादेशी नागरिकांकडे सापडले आहेत. हे दाखले कसे, कोठून आणि कुणाकडून मिळवलेत, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.इनामूल हा मनोहर राहू पवार हे नाव धारण करून चिखले येथे राहत होता. त्याला मराठी भाषा येत असल्याने गावात त्याच्यावर कोणीही संशय घेतला नाही. त्यामुळे त्याचे गावातील एका मुलीसोबत लग्नही लावून देण्यात आले असून, त्याला दोन अपत्य आहेत. इनामूल हा भारतातून बांगलादेशला चोरून जात असे. याच दरम्यान हा प्रकार उघडकीस आला व तालुका पोलिसांनी त्याला अटक केली. आणखी किती नागरिक बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर आले आहेत व किती जणांना असे बनावट कागदपत्र बनवून दिले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.पाच-सहा हजारांतरेशन कार्ड उपलब्धपुरवठा विभागातून रेशन कार्ड, आरटीओमधून लायसन्स, ग्रामपंचायतकडून स्थानिक वास्तव्याचा दाखला, तहसीलकडून वय, अधिवास याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून देण्यात आलेला आहे. त्यामुळे या साऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.बोगस नावाचे कार्ड देऊन पनवेलमध्ये कोणालाही रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स मिळू शकते, हे उघड झाले आहे. या निमित्ताने बोगस नावाने पनवेलमध्ये पाच ते सहा हजार रुपये देऊन रेशन कार्ड मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे. बोगस कागदपत्रे बनवून देणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.पत्रकार बनले एजंटपनवेलमधील दोन ते तीन पत्रकारदेखील तहसील कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले बनवून देत आहेत. शासकीय अधिकाºयांवर दडपण आणून बोगस दाखले बनवले जात असल्याचे समोर आले आहे. हे दाखले बनविण्यासाठी या बांगलादेशीला कोणी कोणी मदत केली, याचा तपास तालुका पोलीस घेत आहेत.काही दिवसांपूर्वी बांगलादेशातून अवैध मार्गाने आलेले बांगलादेशी नागरिक कामोठे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मुंबई विशेष शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कामोठे पोलिसांच्या मदतीने धाकटा खांदा येथे छापा टाकून दहा बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. चौकशीत बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून वास्तव्य करीत असल्याची कबुली त्यांनी दिली होती. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तळोजा पोलीस ठाण्यात त्यांची रवानगी करण्यात आली.- पनवेलसह नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी बांधकाम साइटवर बांगलादेशी नागरिक काम करत असल्याचे समोर आले आहे. तसेच गावातील एखाद्या चाळीमध्ये अधिकचे भाडे मिळते म्हणून मालकही बांगलादेशी नागरिकांना खोल्या भाड्याने देत असल्याचे समोर येत आहे.
बांगलादेशी नागरिकाकडे बनावट शासकीय कागदपत्रे, एजंटवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 5:02 AM