नामदेव मोरे नवी मुंबई : बँक व आर्थिक संस्थांच्या व्यवस्थापनाचा सुरक्षेविषयी निष्काळजीपणा दरोडेखोरांच्या पथ्यावर पडू लागला आहे. २००६ मध्ये ऐरोलीतील बँक दरोड्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव शहीद झाल्याची खळबळजनक घटना व घणसोलीमधील २०१२ मधील एटीएमच्या सुरक्षा रक्षकाच्या खुनानंतरही आर्थिक संस्थांच्या व्यवस्थापनांना अद्याप जाग आलेली नाही. तकलादू सुरक्षा व्यवस्थेमुळे ठेवीदारांची कोट्यवधींची रोकड व दागिने असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.ऐरोली सेक्टर ५ मधील पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर १८ आॅक्टोबर २००६ मध्ये दरोडा पडला. बँकेचे कामकाज सुरू होताच सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. मॅनेजरसह सर्व कर्मचाºयांना एका खोलीमध्ये कोेंडून ठेवले व तिजोरीची चावी घेवून रोकड काढण्यास सुरवात केली. या घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव व हवालदार भिकू मारुती करडे यांनी बँकेत धाव घेतली. दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता समोरून गोळीबार झाला व हल्ल्यात आढाव शहीद झाले. हवालदार करडे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर तत्कालीन पोलीस आयुक्त रामराव वाघ यांनी सर्व बँका, पतसंस्था व इतर आर्थिक संस्थांच्या पदाधिकाºयांची बैठक घेवून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पुढील ११ वर्षांमध्ये सातत्याने दरोडे, घरफोडी व चोरीच्या घटना घडत आहेत. प्रत्येक दरोड्यानंतर पोलीस बँक व्यवस्थापनाच्या बैठका आयोजित करतात. परंतु पोलिसांनी केलेल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नवी मुंबईमधील बँका व इतर संस्थांच्या सुरक्षेसाठीची यंत्रणा पूर्णपणे तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘लोकमत’ने ६ नोव्हेंबरला केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये बहुतांश बँका व एटीएमचे सुरक्षा रक्षक मध्यरात्री झोपले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. दिवसाही बँकांमध्ये ग्राहकांची साधी नोंदही केली जात नाही. सुरक्षा रक्षकांचे येणाºया-जाणाºयांवर अजिबात लक्ष नसते. अनेक ठिकाणी सुरक्षा करण्यास सक्षम नसलेल्यांना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. ९८ टक्के पतसंस्थांमध्ये सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येत आहे.अनेक पतसंस्थांमध्ये रोज ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा होत असते. ही रक्कम पतसंस्था शिपाई किंवा इतर कर्मचाºयांकडून जवळच्या बँकेत भरणा करण्यासाठी देत असते. अत्यंत असुरक्षितपणे रोकड हाताळली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.‘लोकमत’ने दिला होता इशारानवी मुंबईमधील बँका, गृहनिर्माण सोसायटी, व्यापारी संकुलाच्या सुरक्षेविषयी ६ नोव्हेंबरला स्टिंग आॅपरेशन केले होते. यामध्ये बँका, एटीएम सेंटरचे सुरक्षा रक्षक मध्यरात्री झोपले असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले होते. सुरक्षेविषयी निष्काळजीपणामुळे दरोड्यासारखे गंभीर गुन्हे होण्याची शक्यता व्यक्त केली होती.नेरूळमधील नॅशनल बँकेवर दरोडानेरूळ रेल्वे स्टेशन समोरील नॅशनल को आॅपरेटीव्ह बॅकेवर मार्चमध्ये २००६ रोजी दरोडा पडला होता. चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून बँकेतील ११ लाख १२ हजार रूपये लुटून नेले होते. याप्रकरणी दरोडेखोर अशोक जीवनी व त्याच्या साथीदारांना अटक केली होती.पंजाब अँड महाराष्ट्र बँक दरोडाऐरोलीमधील पंजाब महाराष्ट्र बँकेवर १८ आॅक्टोबर २००६ ला पहाटे दरोडा पडला. दरोडेखोरांनी कर्मचाºयांना खोलीत डांबून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडा रोखण्यासाठी आलेल्या पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव व हवालदार भिकू मारूती करडे यांच्यावर दरोडेखोरांनी गोळीबार केला. आढाव यांचा जागीच मृत्यू झाला. करडे यांची प्रकृती सुधारली, परंतु नंतर कर्तव्यावर असताना त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.खारघर कॅनरा बँकेत चोरीखारघर सेक्टर ३० मधील कॅनरा बँकेमध्ये १४ सप्टेंबर २०१७ रोजी चोरी झाली. चोरट्यांनी बँकेचे शटर तोडून आतमधील लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुकेश केशव आडे, रोहित रवींद्र मोरे व इरशाद अली हासन मन्सुरी यांच्या मुसक्या आवळल्या.मणप्पुरम फायनान्सवर दरोडाखारघर येथील मणप्पुरम गोल्ड लोनच्या कार्यालयावर ४ आॅगस्ट २०१० रोजी दरोडा पडला होता. या दरोड्यामध्ये चेन गहाण टाकण्याच्या बहाण्याने तीन जणांनी बंदुकीचा धाक दाखवून लाखो रूपयांचे सोने चोरून नेले होते. पोलिसांनी आरोपी विष्णू ठाकूर, पंकज गिरी व राकेश राठोड यांना अटक करून त्यांच्याकडून २१ किलो सोने व दोन गावठी कट्टे जप्त केले होते.कॅश व्हॅन लुटलीनवी मुंबईमध्ये कॅश व्हॅन घेवून जाणाºया व्हॅनवर दरोडा टाकून १० लाख रूपये लुटल्याची घटना आॅगस्ट २०१३ मध्ये झाली होती. या प्रकरणी तामिळनाडूमधील दरोडेखोर वेलूमुरगम पडीयाची व त्याच्या साथीदारांना अटक केली होती.सीवूड कॅनरा बँकेवर दरोडासीवूड रेल्वे स्टेशनसमोरील कॅनरा बँकेवर सप्टेंबर २००६ मध्ये दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून जवळपास ९ लाख रुपयांची रोकड पळवून नेली होती. रेल्वे स्टेशनसमोर घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.पॉप्युलर फायनान्स दरोडासीवूड्स येथील पॉप्युलर कंपनीमध्ये ६ आॅगस्ट २०१६ रोजी दरोडा पडला. सहा ते सात जणांनी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून जवळपास २२ किलो सोने चोरून नेले होते. जवळपास ६ कोटींचा ऐवज चोरून नेला होता.घणसोलीत एटीएममध्ये खूनघणसोली येथील अभ्युदय बँकेच्या एटीएममधील सुरक्षा रक्षकाचा १३ जुलै २०१२ मध्ये दरोडेखोरांनी खून केला. हेल्मेट घालून आलेल्या व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात सूर्यकांत महाडिक याचा मृत्यू झाला होता.
बँका, आर्थिक संस्था दरोडेखोरांच्या रडारवर, व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा दरोडेखोरांच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 2:34 AM