बाप रे... नागरी वस्तीत आढळला ११ फुट लांब, ४९ किलो वजनाचा पायथॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 20:20 IST2022-11-14T20:13:27+5:302022-11-14T20:20:36+5:30
तालुक्यातील चिरनेर येथे अंकुर क्लिनिक आहे.याच क्लिनिकच्या बाजुला असलेल्या झुडपात हा अजगर भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत आला होता. लपून बसलेला लपून बसला होता

बाप रे... नागरी वस्तीत आढळला ११ फुट लांब, ४९ किलो वजनाचा पायथॉन
मधुकर ठाकूर
उरण : तालुक्यातील चिरनेर येथील अंकुर क्लिनिकच्या जवळ सोमवारी (१४) संध्याकाळच्या सुमारास भला मोठा अजगर आढळून आला.भक्ष्यासाठी झुडपात लपून बसलेल्या ११ फुटी आणि ४९ किलो वजनाच्या भल्या मोठ्या पायथॉन जातीच्या अजगराला सुरक्षितरित्या बाहेर काढून सर्पमित्रांनी त्याला वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने बाबुजी देव जंगलात सुखरूप सोडून दिले.
तालुक्यातील चिरनेर येथे अंकुर क्लिनिक आहे.याच क्लिनिकच्या बाजुला असलेल्या झुडपात हा अजगर भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत आला होता. लपून बसलेला लपून बसला होता. हा भला मोठा अजगर शेजारीच राहणाऱ्या प्रवीण म्हात्रे यांच्या दृष्टीस पडला. याची माहिती त्यांनी सर्पमित्र राजेश पाटील याला दिली.राजेश पाटील यांनी आपले सहकारी हिंमत केणी, विवेक उटली,ॠषीकेश पाटील यांच्यासह झुडूपाची पाहणी केली.या झुडपात भक्ष्यासाठी दबा धरून बसलेला ११ फुट लांबीचा आणि ४९ किलो वजनाच्या भला मोठा अजगर आढळून आला.या अजगराला सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने पकडले आणि वनअधिकाऱ्यांच्या मदतीने बाबुजी देव डोंगरात वनक्षेत्रात नेऊन त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून दिले असल्याची माहिती सर्पमित्र राजेश पाटील यांनी दिली.