नवी मुंबई : बाप्पाच्या सौंदर्यात आणखीन भर पडावी याकरिता कार्यशाळेतील मूर्तींवर हिरे, मोती, रंगीबेरंगी खड्यांचा वापर करून मूर्तीची सजावट केली जात आहे.घरगुती गणेशोत्सवाकरिता सध्या कृत्रिम दागिन्यांचा वापर करून, सोंडेवर, दंडावर खडे चिकटविण्याचा कल वाढला असून कार्यशाळेतील मूर्तींमध्ये सजावटीची लगबग पाहायला मिळते आहे. सजावटीच्या कामाकरिता शहरातील महाविद्यालयीन तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून कल्पक बुध्दीने आकर्षक रंगसंगतीचा वापर करून मूर्तींची सजावट केली जात आहे.सजावटीच्या कामामध्ये महाविद्यालयीन तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून फॅशन डिझायनिंगचे धडे घेणाºया विद्यार्थिनी या मूर्तींवर डायमंड वर्क करताना दिसून येत आहेत.हार, मुकुट, कंबरपट्टा, बाजूबंद, अंगठी आदी अधिक सुबक अलंकारीत करण्यासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे. फावल्या वेळात इमिटेशन ज्वेलरी सजावटीच्या कामाततरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविल्याचे मूर्तिकारांनी स्पष्ट केले. खास मागणी असल्यास मूर्तीला भरजरी कापडाचा पितांबर नेसविला जात आहे.सजावट केलेल्या मूर्तींकरिता प्रत्येक फुटानुसार एक ते दीड हजार रुपये आकारले जात असल्याची माहिती शहाबाज गावातील मूर्तिकारांनी दिली आहे. मूर्तीचे डोळे रंगविणे, नक्षीकाम करणे आदी कामे शेवटच्या टप्प्यात सुरू आहेत.इमिटेशन ज्वेलरी सजावटीच्या कामात तरुणांनी मोठा सहभाग नोंदविल्याचे मूर्तिकारांनी स्पष्ट केले. खास मागणी असल्यास मूर्तीला भरजरी कापडाचा पितांबर नेसविला जात आहे.ग्राहकांच्या मागणीनुसार फेटा, गळ््यात मोत्यांचा हार, हिरेजडित मुकुटाला यंदा मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती शाहबाज गावातील मूर्तिकारांनी दिली आहे.
कृत्रिम आभूषणांनी सजताहेत बाप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 2:18 AM