बसथांबा बनला मृत्यूचा सापळा
By admin | Published: March 27, 2017 06:29 AM2017-03-27T06:29:18+5:302017-03-27T06:29:18+5:30
बसथांब्यावर जाहिरातीसाठी लावलेल्या विजेचा प्रवाशांना शॉक बसत आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका असून
नवी मुंबई : बसथांब्यावर जाहिरातीसाठी लावलेल्या विजेचा प्रवाशांना शॉक बसत आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका असून अनेक दिवसांपासून तक्रार करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नाही.
सीवूड सेक्टर ४२ येथील महाराष्ट्र ज्ञान महामंडळ याठिकाणच्या बसथांब्यावर हा प्रकार घडत आहे. बसथांब्यावर जाहिरात कंपनीतर्फे साईनबोर्ड लावण्यात आलेला आहे. साईनबोर्डवरील जाहिरात रात्रीच्या वेळी दिसावी याकरिता त्यामध्ये विद्युत दिवे बसवण्यात आले असून त्याकरिता घेतलेला विद्युत मीटर बसथांब्यावरच बसवण्यात आलेला आहे. साईनबोर्डमधील वीज प्रवाह केवळ रात्रीच्या वेळी सुरू व्हावा याकरिता त्यामध्ये टायमर देखील बसवण्यात आलेला आहे. परंतु तांत्रिक बिघाडामुळे सदर ठिकाणच्या बसथांब्यामध्ये विजेचा प्रवाह होत आहे. यामुळे प्रवासी अथवा पादचाऱ्याने बसथांब्याला स्पर्श करताच विजेचा शॉक बसत आहे. मागील काही दिवसांत अनेकांसोबत असा प्रकार घडला आहे. त्यापैकी काहींनी जवळच्या वाहतूक पोलीस चौकीत जाऊन पोलिसांना देखील याची माहिती दिली. (प्रतिनिधी)