"लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची", उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:41 AM2024-03-05T10:41:04+5:302024-03-05T10:41:32+5:30

शिवसेनेच्या पनवेल शहरातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. मावळ लोकसभेसाठी पिंपरी-चिंचवड येथील संजोग वाघेरे-पाटील हेच उमेदवार असल्याचेदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला.

Battle of dictatorship vs democracy, Uddhav Thackeray blows the Lok Sabha election bugle | "लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची", उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला

"लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची", उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला

पनवेल : सध्याची लढाई मोदी विरुद्ध नसून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पनवेल येथील सभेत केली. 

शिवसेनेच्या पनवेल शहरातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. मावळ लोकसभेसाठी पिंपरी-चिंचवड येथील संजोग वाघेरे-पाटील हेच उमेदवार असल्याचेदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला.

भाजपला सत्तेत येणार असल्याचा एवढाच आत्मविश्वास आहे, तर फोफाफोडी कशाला करता. अयोध्या विमानतळाचे नामकरण केले तर नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव अद्याप दिले जात नाही, यासह अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. तुम्हाला शिवसेनेने देता येईल ते सगळे दिले. तरीही आमच्या पाठीत वार केला. शिवसेना ही ओळख तुमच्यासमोर आहे म्हणून निवडून आलात. यांना वाटलं की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच. आता घोडा कसा लाथ घालतो ते कळेल, असे सांगून ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

यावेळी खासदार संजय राऊत, ‘शेकाप’चे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, बबन पाटील, संजोग वाघेरे-पाटील आदी उपस्थित होते. शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल शहरातील कार्यालयाच्या बाजूलाच शिवसेने (उबाठा)चे नवीन कार्यालय सुरू करण्यात आल्याने खटके उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, खोपोली येथील जाखोटिया मैदानावरही उद्धव ठाकरे यांची सभा झाली.

ठाकरेंच्या सभेआधी पदाधिकारी शिंदे गटात
रायगड जिल्ह्यातील उरण येथील उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट धरल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला. 

-    राज्य सरकारच्या प्रयत्नांनी येत्या वर्षभरात पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत असून त्यामुळे अनेक संधी निर्माण होणार आहेत. या संधीचा स्थानिक नागरिकांनी सर्वाधिक फायदा घ्यावा, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

‘फ्लेमिंगोंच्या जागेत सत्ताधाऱ्यांच्या मित्रांसाठी बांधकाम परवानगी
नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रारूप विकास आराखड्यात फ्लेमिंगो अभयारण्याच्या परिसरात प्रस्तावित केलेले निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांचा वापरात बदल हे केंद्र आणि राज्यातील राज्यकर्त्यांच्या उद्योगपती दोस्तांसाठी केले आहेत. ठाणे खाडी परिसर फ्लेमिंगाे अभयारण्य व्हावे, म्हणून प्रयत्न केले होते. त्यामुळे त्या क्षेत्रावर काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नेरूळ येथील सभेत केली.
 

Web Title: Battle of dictatorship vs democracy, Uddhav Thackeray blows the Lok Sabha election bugle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.