ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहा; पोलिसांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:56 PM2023-12-23T22:56:09+5:302023-12-23T22:57:30+5:30

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील असलेल्या जागतिक लेणी पाहण्यासाठी दररोज देश विदेशातून हजारो पर्यटक येतात.

Be prepared for the safety of local and foreign tourists visiting Gharapuri Island for Christmas, New Year; Appeal to the police | ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहा; पोलिसांचे आवाहन 

ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहा; पोलिसांचे आवाहन 

मधुकर ठाकूर -

उरण : जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर लेणी पाहण्यासाठी ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षानिमित्त देश-विदेशातून हजारो पर्यटक येत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी बेटावर शुक्रवारी (२३) विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही, यासाठी उपाययोजना म्हणून सर्वच विभागानी सज्ज राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील असलेल्या जागतिक लेणी पाहण्यासाठी दररोज देश विदेशातून हजारो पर्यटक येतात. त्यातच ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व सरत्या वर्षानिमित्त येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते. सणासुदीत बेटावर येणाऱ्या हजारोंच्या संख्येने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (२३) विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलविण्यास आली होती. मोरा सागरी पोलिस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्व विभागाच्या हाॅलमध्ये झालेल्या बैठकीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. 

यामध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या एलिफंटा विभागाचे उप बंदर निरिक्षक विनायक करंजे, एलिफंटा सिक्युरिटी गार्डचे प्रमुख अजय झा व त्यांचे सहकारी, गेटवे जलवाहतूक संस्थेचे प्रतिनिधी,ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकुर, सदस्य  सचिन लाड, सदस्या नीता ठाकुर, भारती पांचाळ, अरुणा घरत, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर,माजी उपसरपंच सचिन म्हात्रे, व्यावसायिक तथा जेष्ठ नागरिक यशवंत म्हात्रे,लोकल गाईडचे प्रतिनिधी कृष्णा भोईर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व सरत्या वर्षानिमित्त बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते.त्यामुळे सुरक्षेयंत्रणेसह बेटावरील कार्यरत असलेल्या सर्वच शासकीय विभागांवर अतिरिक्त ताण वाढतो. त्यामुळे बेटावर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या देशी विदेशी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणेसह अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तर सर्वच शासकीय विभागांची पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चांगलीच तारांबळ उडते. यावर बेटावर कार्यरत असलेल्या सर्वच विभागाने यावेळी बेटावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना करण्यावल चर्चा झाली. त्यावर उपाययोजना म्हणून सर्वच विभागाने सतर्क राहावे असे आवाहन वपोनि औदुंबर पाटील यांनी केले. यावर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी सज्ज असल्याचे सांगितले.

यावेळी माजी उपसरपंच सचिन म्हात्रे यांनी आयोजित महत्त्वाची बैठक यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
 

 

Web Title: Be prepared for the safety of local and foreign tourists visiting Gharapuri Island for Christmas, New Year; Appeal to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.