नवी मुंबई : सिडकोने २०१५मध्ये स्मार्ट दक्षिण नवी मुंबईचे प्रदर्शन भरविताना बेलापूर किल्ल्याच्या सुशोभीकरणाची घोषणा केली होती. ११ कोटी रुपये खर्च करून २०१७पर्यंत किल्ल्याला ऊर्जितावस्था निर्माण करून देण्यात येणार होती; पण प्रत्यक्षात दोन वर्षांत सुशोभीकरण कसे होणार, याचा आराखडाही तयार करण्यात आलेला नाही. संरक्षित किल्ल्याचे क्षेत्रफळ व नक्की काय विकास करणार? हे सर्वच गुलदस्त्यामध्ये असल्याने इतिहासप्रेमींनी सिडको व शासनाविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र शासनाने स्मार्ट सिटी स्पर्धा जाहीर करताच सिडकोने ४ डिसेंबर २०१५मध्ये वाशीतील प्रदर्शिनी हॉलमध्ये विशेष प्रदर्शन भरविले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तत्कालीन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी दक्षिण नवी मुंबईच पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली. या वेळी बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण केले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणाही करण्यात आली. पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने ऐतिहासिक वारसा जपण्यात येणार असून, त्यासाठी ११ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली होती. २०१७पर्यंत सुशोभीकरण पूर्ण करण्यात येणार होते; पण तेव्हापासून अद्याप सुशोभीकरणासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. किल्ल्याच्या चारही बाजूने बांधकामे झाली आहेत. सिडको गेस्ट हाउससह निवासी इमारतीही आहेत. यामुळे प्रत्यक्ष किल्ल्याचे क्षेत्रफळ किती हेच निश्चित झालेले नाही. किल्ल्यावरील सर्व बांधकामे नष्ट झाली आहेत. फक्त एक टेहळणी बुरूज अर्धवट मोडकळलेल्या अवस्थेमध्ये आहे. बुरुजाला एक बाजूला भेग पडली आहे. दुसऱ्या बाजूला मोडकळीस आलेल्या बांधकामावर पर्यटक जात असतात. बांधकाम धोकादायक स्थितीमध्ये असल्याने ते कोसळून त्यावर जाणाऱ्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे. या बुरुजाचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. बेलापूर किल्ला हा नवी मुंबईमधील एकमेव ऐतिहासिक ठेवा आहे. ४५७ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याचे जतन करण्याची गरज आहे. भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अनेक वर्षांपासून किल्ल्याचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासन व सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनीही अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला आहे. ""सुशोभीकरणाचा दिखावासिडकोकडून बेलापूर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा फक्त दिखावा केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये २०१७पर्यंत ११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती; पण या निधीतून नक्की कोणती कामे करण्यात येणार, हे सांगितलेच नाही. दिलेला कालावधी संपण्यास फक्त ६ महिने शिल्लक आहेत. एवढ्या कमी कालावधीमध्ये सुशोभीकरण कसे पूर्ण होणार व नक्की काय कामे केली जाणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यामुळे सुशोभीकरण फक्त स्मार्ट सिटीच्या प्रदर्शनापुरतेच मर्यादित होते हे स्पष्ट होऊ लागले आहे. बेलापूर किल्ल्याचे वास्तवकिल्ल्यावर फक्त टेहळणी बुरुजाची एक वास्तू अस्तित्वात महापालिका मुख्यालयासमोरील टेहळणी बुरूज नामशेष होण्याच्या मार्गावर किल्ल्यावरील सर्व बांधकामे नष्ट केल्याने फक्त दगड, विटांचा खच किल्ल्याचे क्षेत्रफळ किती? याविषयी स्पष्टता नाहीकिल्ल्यावर फिरण्यासाठी रस्ता नसल्याने गैरसोय
बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण कागदावरच
By admin | Published: May 02, 2017 3:34 AM