उरण : उरण एसटी स्थानकानजीक चारफाटा येथील जागेचे सिडको लवकरच सुशोभीकरण करणार आहे. ओएनजीसीच्या मदतीने हे सुुशोभीकरण केलेजाणार आहे. यामुळे उरणच्या सौंदर्यात भरच पडणार असल्याची माहिती सिडकोचे अनधिकृत नियंत्रण कक्षाचे सहायक अधिकारी एस. आर. राठोड यांनी दिली.उरण-चारफाटा हा चौक परिसर सिडकोच्या मालकीचा आहे. उरण शहराच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या जागेला अनधिकृत बांधकामामुळे बकालपणा आला होता. यामध्ये विविध प्रकारच्या शेकडो गाळे, दुकाने, टपऱ्या आणि हातगाड्यांचा समावेश होता. सिडकोने चारफाटा येथील कच्च्या-पक्क्या अनधिकृत बांधकामांवर अनेकदा कारवाईचा बुलडोझर फिरविला होता. मात्र, सिडकोची पाठ फिरताच भूमाफियांना हाताशी धरून पुन्हा त्याच जागी नव्याने अनधिकृत बांधकामे तयार होत होती. त्यामुळे सिडकोच्या कारवाईचाही अनधिकृत बांधकामधारकांवर कोणताही परिणाम होत नव्हता. त्यामुळे आता चारफाटा चौक परिसरातील अनधिकृत बांधकामांचे वाढते पेव बंद करण्यासाठी सिडकोने नवी शक्कल काढली आहे. या चौक परिसराचे सुशोभीकरण करण्याची योजना सिडकोने आखली आहे. यासाठी चौक परिसरात उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामांवरही सिडकोने कारवाई के ली आहे.
चारफाट्याचे सिडको करणार सुशोभीकरण
By admin | Published: December 26, 2016 7:04 AM