‘त्या’ इमारतीच्या पाडकामाला सुरुवात, कळंबोलीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 03:22 AM2019-08-12T03:22:14+5:302019-08-12T03:22:29+5:30

कळंबोली सिडको वसाहतीतील सेक्टर ३ ई येथील मोडकळीस आलेली रिधिमा इमारत जमीनदोस्त करण्याचे काम रविवारी हाती घेण्यात आले आहे.

 The beginning of the 'that' building, the type of kalamboli | ‘त्या’ इमारतीच्या पाडकामाला सुरुवात, कळंबोलीतील प्रकार

‘त्या’ इमारतीच्या पाडकामाला सुरुवात, कळंबोलीतील प्रकार

Next

कळंबोली : कळंबोली सिडको वसाहतीतील सेक्टर ३ ई येथील मोडकळीस आलेली रिधिमा इमारत जमीनदोस्त करण्याचे काम रविवारी हाती घेण्यात आले आहे. गुरु वारी या इमारतीचा काही भाग कोसळल्याने पाठीमागील सिडकोची घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीस धोका निर्माण झाला होता, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार सोसायटीने रविवारी ही धोकादायक इमारत पाडण्यास सुरु वात केली; परंतु एका तासानंतर हे पाड काम थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा हे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
कळंबोली सिडको वसाहतीतील करवली नाका जवळच असलेल्या धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरु वारी कोसळला, त्यानुसार सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने या इमारतीच्या पाठीमागील ई १ टाइपमधील ४० घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीतील १८ घरे रिकामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार संबंधित सदनिकाधारकांनी तत्काळ घरे खाली केली. दरम्यान, अतिधोकादायक ठरलेल्या रिधिमा इमारतीवरील कारवाईवरून सोसायटीधारक आणि महापालिकेत वाद निर्माण झाला होता. इमारत पाडण्याचा खर्च कोणी करायचा याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने चार दिवस हा विषय जैसे थे राहिला होता. रिधिमा इमारतीतील सदनिकाधारकांसोबत चर्चा करून इमारत पाडण्याचा खर्च सोसायटीधारकांच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे अखेर सोसायटीने महापालिकेला कळविले. त्यानुसार शनिवारी माटे असोसिएटस या कंपनीला पाडकाम देण्यात आले. यासाठी साडेसात लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत. यासाठी मशिन पुण्यावरून मागवण्यात आली आहे. रविवारी मशिन कळंबोलीत आल्यानंतर सायंकाळी ५ वाजता इमारत जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरु वात करण्यात झाली; परंतु एका तासानंतर हे काम थांबवण्यात आले. उर्वरित काम सोमवारी केले जाणार आहे. या वेळी महापालिकेचे प्रभाग अधिकारी हरिश्चंद्र कडू, अभियंता राहुल जाधव, मनोज चव्हाण त्यांच्यासह नगरसेवक सतीश पाटील, बबन मुकादम, भाजपचे अध्यक्ष प्रशांत रणवरे उपस्थित होते.

सुरक्षिततेसाठी ६0 कुटुंबांचे स्थलांतर

मोडकळीस आलेली रिधिमा इमारत कोसळण्याच्या भीतीने परिसरातील ६० कुटुंबांनी आपली राहती घरे रिकामी केली आहेत. त्यांनी आपल्या नातेवाइकांकडे आसरा घेतला आहे.

रविवारी ही इमारत जमीनदोस्त करण्याचे काम अर्धवट राहिल्याने ६० कुटुंब रस्त्यावर उतरले होते. आम्ही राहायचे कुठे? असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला.

त्यानुसार महापालिका तसेच पोलिसांनी मध्यस्थी करत कळंबोलीतील काळभैरव हॉल येथे कुटुंबीयांच्या राहणे तसेच जेवनाची व्यवस्था करून देण्यात आली.

कारवाई दरम्यान बघ्यांची गर्दी

धोकादायक असलेली रिधिमा इमारत रविवारी सायंकाळी ५ वाजता पाडण्यास सुरु वात केल्यानंतर कळंबोलीतील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
इमारतीच्या चारही बाजूने गर्दी झाल्याने पोलीस तसेच
महापालिका कर्मचाऱ्यांनी ही गर्दी पांगवली, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार सूचना देण्यात येत होत्या.

Web Title:  The beginning of the 'that' building, the type of kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.