बदलत्या जीवनशैलीच्या अध्यायाचा प्रारंभ; कोरोनामुळे सवयीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:27 AM2020-07-02T04:27:21+5:302020-07-02T04:27:34+5:30

शंभर दिवसांमध्ये बरे, वाईट अनुभव; पारंपरिक गोष्टींकडे पुन्हा वाटचाल

The beginning of a changing lifestyle chapter; Changes in habits due to corona | बदलत्या जीवनशैलीच्या अध्यायाचा प्रारंभ; कोरोनामुळे सवयीत बदल

बदलत्या जीवनशैलीच्या अध्यायाचा प्रारंभ; कोरोनामुळे सवयीत बदल

Next

अरुणकुमार मेहत्रे
 

कळंबोली : गेल्या तीन महिन्यांपासून घरी बंदीस्त असलेली लहान मुले , वयस्कर व्यक्ती, कुटुंबातील सर्वच सदस्यावर या कोरोनाचा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे अनेक सवयी बदलल्या आहेत.

दररोज शाळा, त्याचबरोबर मैदानावर बागडणारी बच्चे कंपनी खेळणे विसरली आहेत. एका ठिकाणी न बसणाऱ्या लहान मुलांना सुरुवातीला घरात बंदीस्त राहणे अवघड गेले. परंतू आता त्यांना सवय झाली आहे. टिव्हीच्या सानिध्यात आवडता कार्यक्रम ,कार्टून पाहण्यात ते दिवस घालवत आहेत. जून महिन्यात शाळेकडून आॅनलाईन अभ्यासक्रम चालू झाल्याने मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण घेणे सुरु केले आहे.

दर आठवड्याला खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये गर्दी करणाºया नागरीकांचा तेथे होणारा खर्च नियंत्रणात आला आहे. बाहेर न पडल्याने कुटुंबातील सदस्यांच्या झोपेत वाढ झाली आहे. सकाळ- संध्याकाळ फिरायला जाणारी आणि व्यायाम करणारी लोकं घरीच गच्चीवर, गॅलरीत योगासने करत आहे. मिळलेल्या वेळेत पुस्तकात रमणे सोपे झाले. तीन महिन्यात खूपश्या सवयी बदलल्या आहे. लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच वेळ मिळाला. ऐवढे नव्हे तर आता वेळ कसा घालवावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला. तरी देखील सर्वांनीच आहे त्या परिस्थितीशी मिळते जुळते घेण्यास सुरुवात केली. दूर राहून काम करणे , दूर राहून वैद्यकीय मदत मिळवणे, विविध तंत्रज्ञानच्या साह्याने शिक्षण घेणे याची सवय झाली आहे. परिस्थितीवर मात करण्याच्या गरजेतून लोक नवनवीन शोध लावण्याबरोबर युक्त्याही लढवत आहेत. त्यामुळे  दिवसेंदिवस डिजिटल सेवेत भर पडत आहे. काही गोष्टींत बदल झालेला ट्रेंड आता नागरिकांना हवाहवासा वाटू लागला आहे. काही बाबींचा कंटाळा आला आहे. कोरोनामुळे मानवी दैनंदिन जीवन जगणे पूर्णपणे बदलून गेले आहे. लोकांच्या जीवनशैलीतच बदल झाला आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.

कुटुंबात स्नेहभाव वाढला
नवी मुंबई : लॉकडाऊनला तब्बल शंभर दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या शंभर दिवसांच्या काळात अनेक गोष्टी बदलल्या. उद्योगधंदे ठप्प झाले. लाखो बेरोजगार झाले. हातावर पोट असणाºया कष्टकऱ्यांचे हाल झाले. एकूणच लॉकडाऊनमुळे जगण्याचे परिमाणच बदलेले. कुटुंब व्यवस्थेत परिणामकारक बदल घडले. लॉकडाऊन ही संधी समजून अनेक कुटुंबातील सैल झालेल्या नात्यांच्या विणा घट्ट झाल्या, तर परस्परातील हरवलेला संवाद पुनर्स्थापित झाला.

अनेकांना नैराश्य आले आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, हे परिणाम कुटुंबनिहाय वेगवेगळे आहेत. कुटुंबाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक अशा तीन प्रकारांत वर्गवारी करण्यात येते. तिन्ही प्रकारच्या कुटुंबांवर लॉकडाऊनचे विभिन्न परिणाम दिसून येतात. हातावर पोट असलेल्या कुटुंबांच्या व्यथा वेगळ्या आहेत. घरात राहून त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात कलह निर्माण करण्यास लॉकडाऊन कारण ठरत आहेत.

आर्थिक परिस्थिती बºयापैकी असलेल्या आणि शैक्षणिक दर्जा उत्तम असलेल्या कुटुंबासाठी लॉकडाऊन संधी वाटते आहे. मोबाइल, गेमिंग, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, फेसबुक आदींसह टीव्ही आदी मनोरंजनाची विपुल साधने उपलब्ध असल्याने अशा कुटुंबात मौजमस्तीचे वातावरण पाहावयास मिळते, परंतु मानवी मनाचा विचार करता, ही प्रक्रियासुद्धा मर्यादित स्वरूपाची. त्यामुळे कधी एकदाचे लॉकडाऊन संपते, अशी नैराश्यपूर्ण प्रतिक्रिया त्यांच्यातून उमटत आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबाचेही फारसे वेगळे नाही. आठ-पंधरा दिवस ठीक आहे. परंतु सलग तीन महिन्यांच्या कोंडीने कुटुंब संस्थेच्या मूल्यांनाच हादरे बसताना दिसत आहेत. असे असले तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन संपूर्ण अनलॉक कधी होईल, याची सध्या कोणीच ग्वाही देऊ शकत नाही. त्यामुळे पुढील आणखी काही महिने लॉकडाऊनमध्येच राहावे लागणार, हे सर्वसामान्यांना आता उमजले आहे.
 

Web Title: The beginning of a changing lifestyle chapter; Changes in habits due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.