मोर्चेबांधणीला सुरुवात

By admin | Published: November 12, 2015 01:50 AM2015-11-12T01:50:48+5:302015-11-12T01:50:48+5:30

ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा खाली बसत नाही तोपर्यंतच जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे.

Beginning of the front | मोर्चेबांधणीला सुरुवात

मोर्चेबांधणीला सुरुवात

Next

आविष्कार देसाई, अलिबाग
ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा खाली बसत नाही तोपर्यंतच जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नजर टाकल्यास सर्वच राजकीय पक्षांची पावले स्थानिक पातळीवरील सोयीस्कर राजकारणाकडे पडत असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, खालापूर, सुधागड-पाली येथील ग्रामपंचायचींचे रुपांतर आता नगरपंचायीतीमध्ये होणार आहे. प्रशासनाने त्या दिशेन आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. प्रामुख्याने माणगाव नगरपंचायतीचे आरक्षण खुल्या प्रवर्गाच्या पुरुषासाठी आले आहे. म्हसळा-इतर मागास वर्गीय (पुरुष), तळा, पोलादपूर आणि खालापूर नगरपंचायतींसाठी खुला वर्गाची महिला विराजमान होणार आहे. सुधागड-पाली नगर पंचायतीच्या निवडणुकीला न्यायालयीन कारणामुळे स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील आरक्षण काढण्यात आलेले नाही.
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सध्या रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे सख्य वाढल्याने त्यांची आघाडी नगर पंचायतीच्या निवडणूकीतही कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना-भाजपा हे जिल्ह्यातील निवडणूकीसाठी शेकापचे शत्रु राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सुपडासाफ झाल्याने काँग्रेस अद्यापही त्या पराभवाच्या छायेतून बाहेर आल्याचे दिसत नाही. त्यांनी नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निश्चय केला आहे. युती- आघाडी बाबत कोणाकडून विचारणा झाल्यास त्यावर पक्ष विचार करेल जिल्हा काँग्रेसचा होरा आहे.
भाजपाला निवडणूक लढवाची असून अद्याप युती-आघाडीबाबत निर्णय झाला नसून स्थानिक राजकारणाचा विचार करुन निर्णय घेण्यावर त्यांचा कल असल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करुनच हि निवडणूक लढविली जाईल असे एकंदर चित्र आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सोयीस्कर राजकारणाचा डाव येथे खेळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवसेना आणि भाजपा सोडून इतर मित्र पक्षाबरोबर ही निवडणूक लढविली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचातींच्या निवडणुकीत शेकापने उत्तम विजय संपादीत केला आहे. नगर पंचायतीवरही आमचे वर्चस्व राहील.
- आमदार जयंत पाटील , सरचिटणीस, शेकाप
नगर पंचायतीची निवडणूक लढणार एवढे निश्चित आहे. युती कोणत्या पक्षाबरोबर करायची हे ठरलेले नाही. याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा त्यावेळी जरूर विचार केला जाईल.
- बाळासाहेब पाटील,
जिल्हाध्यक्ष, भाजपा

Web Title: Beginning of the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.