घणसोलीत ‘झेस्ट २०१८’ महोत्सवाला दिमाखात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:15 AM2018-01-19T01:15:08+5:302018-01-19T01:15:08+5:30
घणसोली येथील राजीव गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘झेस्ट २०१८’ या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई : घणसोली येथील राजीव गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘झेस्ट २०१८’ या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. मैदानी खेळांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत या महोत्सवादरम्यान रंगणार असून, त्याचा शुभारंभ गुरुवारी बॉक्स क्रिकेटच्या उद्घाटनापासून करण्यात आला.
बौद्धिक विकासासह विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये खेळांची रु ची निर्माण झाली पाहिजे, याच उद्देशाने घणसोली येथील राजीव गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या वतीने ‘झेस्ट २०१८’ या चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मैदानी खेळ, बुद्धिकौशल्य वाढवणारे खेळ, सांस्कृतिक कार्यक्र म होणार आहेत. या महोत्सवाचा शुभारंभ डॉ. हेनरी, शिरीष मोहिते, विनोद शहा, डॉ. अनिल मटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरु वारी संपन्न झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बॉक्स क्रि केटचे सामने खेळवण्यात आले. तर पुढील कालावधीत चेस, कॅरम, रांगोळी, फेस पेंटिंग अशा इनडोअर गेमसह नृत्य व गायनाच्या स्पर्धादेखील घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट नजरेत ठेवून, ‘झेस्ट २०१८’ हा महोत्सव साजरा होत असल्याचे राजीव गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अनिल मटकर यांनी सांगितले. तर महोत्सवाचे संपूर्ण आयोजन व नियोजन यातही विद्यार्थ्यांचाच सहभाग असल्याने त्यांच्यातील कौशल्य उघड होत असल्याचाही आनंद त्यांनी व्यक्त केला.