पनवेलमधील केवाळे पुलाच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:14 AM2019-04-11T00:14:48+5:302019-04-11T00:14:51+5:30

नागरिकांना दिलासा : पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता

The beginning of the work of the Kewal bridge in Panvel | पनवेलमधील केवाळे पुलाच्या कामाला सुरुवात

पनवेलमधील केवाळे पुलाच्या कामाला सुरुवात

पनवेल : तालुक्यातील केवाळे गावाजवळील नवीन व रुंद पुलाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु वात करण्यात आली आहे. जुना पूल पाडण्यात आला असून नागरिकांसाठी पर्यायी रस्ता ठेवण्यात आलेला आहे.


केवाळे येथील अरुंद पुलामुळे नागरिकांना अनेकदा वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत वाकडी व केवाळे गावाला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आला होता. पुलाच्या खालील बाजूस असलेल्या लोखंड गंजले होते. प्लॅस्टरही निखळले होते. त्यामुळे हा पूल धोकादायक बनला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्तही प्रसिद्ध केले होते.


आचारसंहिता लागण्यापूर्वी या पुलांच्या कामाला सुरु वात करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या आत नवीन व रुंद पूल तयार होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
या भागात केवाळे, वाकडी, चिंचवली, उसर्ली, दुंदरे, मोरबे यांच्यासह आदिवासीवाड्यांचे प्रमाण अधिक असल्याने सतत नागरिकांची वर्दळ सुरू असते. केवाळे येथील वाहतुकीस अरुंद ठरत असलेला पूल पाडण्यात आला असून त्या ठिकाणी १० बाय ३ मीटरचे गाळे असलेला नवीन पूल बांधण्यात येत आहे. त्याची रु ंदी ८.२५ मीटर करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी २ लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.


पुलाच्या कामाला सुरु वात करण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होऊन पूल नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एन. डी. पवार यांनी दिली.

Web Title: The beginning of the work of the Kewal bridge in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.