शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बेलापूर किल्ला होणार पर्यटनस्थळ, सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 3:20 AM

पर्यटनस्थळ म्हणून होणार विकास : कंत्राटदाराची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नवी मुंबई : ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कामासाठी कंत्राटदाराची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, साधारण एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीनंतर सिडकोने या संबंधीचा आराखडा तयार केला आहे. हा ऐतिहासिक किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा सिडकोचा मानस आहे.

बेलापूर किल्ला हा नवी मुंबईमधील एकमेव ऐतिहासिक ठेवा आहे. १५६० मध्ये किल्ल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. १७३३ मध्ये चिमाजी आप्पाने हा किल्ला जिंकला व तब्बल ८४ वर्षे तो मराठा साम्राज्याचा भाग होता. ४५७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या किल्ल्याला पूर्वी पाच मोठे बुरूज होते. त्यापैकी तीन बुरूज निखळले आहेत. सध्या दोन बुरुजांचे अवशेष शिल्लक आहेत, त्यामुळे वेळीच त्याचे संवर्धन झाले नाही, तर किल्ल्याचे संपूर्ण अस्तित्व संपून जाईल, अशी भीती इतिहासप्रेमींनी व्यक्त केली होती, तसेच किल्ल्याच्या संवर्धनासाठी तातडीने कार्यवाही करावी, यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विविध स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुसार सिडकोने या किल्ल्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेत २०१७ मध्ये या कामासाठी निविदा मागविल्या होत्या; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दोन वेळा फेरनिविदा मागविण्यात आल्या. तिसऱ्यांदा केवळ एकच कंत्राटदाराने निविदा सादर केली. ही ऐकमेव निविदा स्वीकारण्यात आली असून तांत्रिक आणि आर्थिक बाजूची पडताळणी करण्यासाठी ती निविदा कमिटीकडे पाठविण्यात आली आहे. निविदा कमिटीच्या अभिप्रायानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मान्यता घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा खर्च निर्धारित केला आहे. काम पूर्ण करण्याची कालमर्यादा २४ महिन्याची असणार आहे. याअंतर्गत किल्ल्याच्या सभोवतालची दोन हेक्टर जागाही सुशोभित करणार आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूला कोणताही धक्का न लावता हे सुशोभीकरणाचे काम केले जाणार आहे.प्रस्तावित सुविधानवी मुंबईतील एकमेव ऐतिहासिक ओळख असलेल्या बेलापूर किल्ला आणि परिसरात सुशोभित करून एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यात अ‍ॅम्पी थिएटर, फूड कोर्ट, टेहळणी बुरूज तसेच प्रशस्त पार्किंग, सुसज्ज आसन व्यवस्था, विरंगुळा केंद्र, आॅडिओ, व्हिडीओ आणि चित्र रूपात किल्ल्याचा इतिहास सांगणारी यंत्रणा आदी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहेत.बेलापूर किल्ल्याची डागडुजी करून ऐतिहासिक ठेवा जतन केला जाणार आहे. या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची योजना आहे. त्यासाठी कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. साधारण एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.- प्रिया रतांबे,मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFortगड