नवी मुंबई : शहरातील घनकचरा वाहतूक करणाऱ्या महापालिकेच्या घंटागाडींमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणावर कचऱ्याची वाहतूक केली जात असल्याने हवेमुळे कचरा रस्त्यात पडत आहे. उघड्यावर होणाºया कचºयाच्या वाहतुकीमुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी अरुंद आणि पार्किंगने व्यापलेल्या रस्त्यांवरील सोसायटी आणि कचराकुंडींमधील कचरा गोळा करण्यासाठी लहान घंटागाडींचा वापर केला जातो.
तसेच मोठ्या रस्त्यांवरील सोसायटी आणि कचराकुंडींमधील कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या बंदिस्त वाहनांचा वापर केला जातो. लहान घंटागाडी बंदिस्त नसून त्यांची क्षमता कमी असतानाही कचऱ्याचा ढीग रचला जातो. घंटागाडीमध्ये कचऱ्याचा थर जास्त असल्याने वाºयामुळे कचरा रस्त्यावर पडत आहे. तसेच सदर वाहने बंदिस्त नसल्याने कचरा वाहतूक करणाºया परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे.