जेएनपीए बंदरात मोठी कारवाई! आयात करण्यात आलेला ३२ कोटी रुपयांचा सुपारी साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 11:35 PM2023-09-10T23:35:51+5:302023-09-10T23:37:19+5:30

डीआरआय विभागाची कारवाई

Betel nut stock worth Rs 32 crore seized from JNPA port by way of smuggling | जेएनपीए बंदरात मोठी कारवाई! आयात करण्यात आलेला ३२ कोटी रुपयांचा सुपारी साठा जप्त

जेएनपीए बंदरात मोठी कारवाई! आयात करण्यात आलेला ३२ कोटी रुपयांचा सुपारी साठा जप्त

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीए बंदरातून कॅल्शियम नायट्रेटच्या बनावट नावाने तीन लाख ७१ हजार ९० किलो  तस्करी करण्यात येत असलेल्या ३२ कोटी रुपयांच्या सुपारी जप्त केल्या आहेत. भारतातील सुपारी तस्करीची  सर्वात मोठी जप्ती असल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 डीआरआय विभागाला खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर कॅल्शियम नायट्रेटच्या बनावट नावाने आयात करण्यात आलेल्या सुपारीचे १४ कंटेनरचा साठा हाती लागला. तीन लाख ७१ हजार ९० किलो  तस्करीच्या मार्गाने आयात करण्यात आलेला ३२ कोटी रुपयांच्या सुपारीचा जप्त केला आहे.

कस्टम ड्युटी चुकवण्याच्या प्रयत्नातून हा प्रकार  उघडकीस आला असल्याची माहिती डिआरआय अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Betel nut stock worth Rs 32 crore seized from JNPA port by way of smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.