मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए बंदरातून कॅल्शियम नायट्रेटच्या बनावट नावाने तीन लाख ७१ हजार ९० किलो तस्करी करण्यात येत असलेल्या ३२ कोटी रुपयांच्या सुपारी जप्त केल्या आहेत. भारतातील सुपारी तस्करीची सर्वात मोठी जप्ती असल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले.
डीआरआय विभागाला खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर कॅल्शियम नायट्रेटच्या बनावट नावाने आयात करण्यात आलेल्या सुपारीचे १४ कंटेनरचा साठा हाती लागला. तीन लाख ७१ हजार ९० किलो तस्करीच्या मार्गाने आयात करण्यात आलेला ३२ कोटी रुपयांच्या सुपारीचा जप्त केला आहे.
कस्टम ड्युटी चुकवण्याच्या प्रयत्नातून हा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती डिआरआय अधिकाऱ्यांनी दिली.