शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
5
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
6
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
7
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
8
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
9
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
10
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
11
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
12
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
13
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
14
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
15
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
16
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
17
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
18
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
19
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
20
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान

भारत सेवाश्रम संघाची कर्करोग पीडितांना मदत

By admin | Published: February 04, 2017 3:40 AM

वाशी गावातील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने गेली २९ वर्षे देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण अत्यल्प खर्चात उपचार, आर्थिक सहाय्य, शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध

- प्राची सोनवणे, नवी मुंबईवाशी गावातील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने गेली २९ वर्षे देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण अत्यल्प खर्चात उपचार, आर्थिक सहाय्य, शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅन्सरग्रस्त रुग्ण आढळत असून या रुग्णांना राहण्या-खाण्यासाठी, उपचारासाठी पुरेपूर सहाय्य करण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते.परराज्यातून येणाऱ्या रुग्णांना राहण्याची सोय, भरपेट जेवण, उपचाराकरिता रुग्णालयातील खर्चात मदत, फावल्या वेळेत कौशल्य विकास तसेच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम वर्षोनुवर्षे केले जात आहे. आसाम, नागालँड, बांगलादेश, नेपाळ, ओडिशा, बंगाल आदी रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. खारघर येथील टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दररोज मोफत बससेवा पुरविली जात असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील रुग्णांना याठिकाणी मोफत उपचार दिले जातात. याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांकरिता दररोज सकाळी ३ तासांची शिकवणी,संगणक प्रशिक्षण दिले जाते. दर आठवड्याला याठिकाणी राहणाऱ्या रुग्णांच्या आरोग्य तपासणीकरिता तज्ज्ञ डॉक्टर भेट देतात. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी अंबिका योग कुटीरच्या सहयोगाने याठिकाणी योगाभ्यासाचे धडे दिले जातात. सध्या ११० कर्करोग रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची विविध विषयांवर शिकवणी घेतात.जागतिक दर्जाचे केंद्रनवी मुंबई हे देशातील कॅन्सर संशोधनासाठीचे प्रमुख केंद्र ठरू लागले आहे. खारघरमध्ये ६० एकर भूखंडावर टाटा मेमोरियल सेंटर उभारण्यात आले आहे. येथे २५० बेडचे सुसज्ज रूग्णालय आहे. रूग्णांवर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीओलॉजी उपचारांची सुविधा आहे.याठिकाणी संशोधनाचीही सुविधा असून तज्ज्ञ डॉक्टर घडविण्याचे काम सुरू आहे. आसाम भवनमधील दोन मजले रुग्णांसाठीआसाममधील वाढत्या कर्करोग रुग्णांची दखल घेत वाशीतील आसाम भवनमधील दोन मजले केवळ कर्करोग रु ग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय विविध उपचारांसाठी आसाम सरकारने निधीतही वाढ केली असून औषधोपचार, प्रवास खर्च, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.- कर्करोग कसा होतो, त्याची लक्षणे, उपचार पध्दती आदींविषयी माहिती देण्यासाठी महिन्यातून एकदा जनजागृती शिबिराचे आयोजन केले जाते. नवी मुंबई परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी याठिकाणी भेट देऊन रुग्णसेवेत पुढाकार घेत असल्याची माहिती संस्थाचालक स्वामी प्रशांतानंदजी दिली.