शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

भावे नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपासून होणार सुरू, नाट्यरसिकांची गैरसोय टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 12:03 AM

शहरातील नाट्यरसिकांसाठी सिडकोने १९९६ मध्ये वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहाची निर्मिती केली आहे.

नवी मुंबई : शहरातील एकमेव विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, १ जानेवारी २०२० रोजी महापालिकेच्या वर्धापन दिनी प्रेक्षकांसाठी ते खुले होणार आहे. नूतनीकरणात अनेक नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नाट्यरसिकांची आणि कलाकारांची होणारी गैरसोय टळणार आहे.शहरातील नाट्यरसिकांसाठी सिडकोने १९९६ मध्ये वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहाची निर्मिती केली आहे. कालांतराने हे नाट्यगृह नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. नाट्यगृहात आवश्यक कामे करण्यात आली असली तरी नूतनीकरण न झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे नाट्य कलाकार आणि रसिकांकडून नाराजी व्यक्त होत होती. त्याअनुषंगाने महापालिकेने नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले.सुमारे १००१ बैठक व्यवस्था असलेल्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सुमारे १३ कोटी रु पये खर्च करण्यात आला आहे. यामध्ये अंतर्गत स्थापत्य कामे, आधुनिक वातानुकूलित यंत्रणा बसविणे, ध्वनी व प्रकाश योजना नियंत्रण यंत्रणा बसविणे, प्लास्टर करणे, कार्पेट बसविणे, फॉल सिलिंग करणे, नवीन खुर्च्या बसविणे, कलाकारांचा विश्रांती कक्ष व खोल्या तसेच कार्यालयाचे नूतनीकरण करणे, लॉबीचे नूतनीकरण करणे, अग्निशमन यंत्रणा बसविणे, पार्किंग व्यवस्थेचे नियोजन, संरक्षक भिंतीची सुधारणा, दिव्यांग व्यक्तींच्या प्रवेशासाठी बॅरिअर फ्री प्रवेश व्यवस्था, अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा, अद्ययावत विद्युत व्यवस्था, प्रसाधनगृह, टाइल्स, वॉटर प्रूफ आदी कामे करण्यात आली आहेत. नाट्यगृहात येणाऱ्या अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नाट्यगृहामधील प्रेक्षकगृहातील किरकोळ कामे वगळता सर्वच कामे पूर्ण झाली असून, बाह्य कामे सुरू आहेत. शहरातील नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद असल्याने नाट्यरसिकांना मुंबई, ठाणे अथवा मुलुंड येथील नाट्यगृहात जावे लागत होते, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. नूतनीकरणाच्या माध्यमातून भावे नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होत असून, नाट्यरसिकांना ही नवी पर्वणी ठरणार आहे.विष्णुदास भावे नाट्यगृहातील प्रेक्षकगृहात सुरू असलेली सर्वच कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. प्रेक्षकगृहाच्या बाहेरील भागातील कामे सुरू असून, त्याचा कोणताही परिणाम नाट्यगृहातील कार्यक्र मांवर होणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या वर्धापन दिनापासून नाट्यगृहातील प्रेक्षकगृहाचा वापर करता येणार आहे.- सुरेंद्र पाटील,शहर अभियंता

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई