शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईतही, ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 6:59 AM

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायींवरील हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. नवी मुंबईत ठिकठिकाणी रास्ता रोको करून, तसेच मोर्चे काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

नवी मुंबई : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायींवरील हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. नवी मुंबईत ठिकठिकाणी रास्ता रोको करून, तसेच मोर्चे काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनता असुरक्षित असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.तुर्भे येथील संतप्त जमावाने ठाणे-बेलापूर मार्गावर टायर पेटवून रास्ता रोको केला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी आंदोलनाची भूमिका ठरवण्यासाठी ऐरोली येथे विविध राजकीय संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर ऐरोलीत आरपीआयच्या वतीने मोर्चा काढून नवी मुंबई बंदची घोषणा करण्यात आली. दरम्यान, एक ते दोन दुकानांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. तर रबाळे येथे काहींनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको केला. चिंचपाडा येथे रस्त्यावर उतरलेल्या जमावाने ठाणे-बेलापूर मार्ग अडवून धरला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त जमावाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या गस्ती वाहनाची काच फुटल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तुर्भे नाका येथील पुलाखाली जमलेल्या महिला व पुरुषांच्या जमावाने त्या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.कामोठेत दुकाने बंदकामोठेत मंगळवारी सायंकाळी जमावाकडून घोषणाबाजी करीत दुकाने बंद ठेवण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी जमलेल्या जमावास समज देऊन वातावरण शांत केले. जमावाने क्रांतीचौक, उस्मानपुरा ते पीर बजार रस्त्यावरील दुकाने बंद केली. टी.व्ही.सेंटर, येथे सुमारे हजारो लोकांचा जमाव रस्त्यावर आला. त्यांनी परिसरातील भाजीपाल्याची दुकाने आणि हातगाड्या पालथ्या केल्या. यामुळे लहान-मोठ्या दुकानदारांमध्ये तणाव निर्माण झाला. जयभवानीनगर येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवर दगडफेक करून प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या. त्रिमूर्ती चौक, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, येथील दुकानाच्या काचा फोडण्यात आल्या.शहरात चोख पोलीस बंदोबस्तभीमा कोरेगाव या ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद पनवेलमधील काही भागात उमटल्याचे मंगळवारी पाहावयास मिळाले. विविध संघटनांनी निषेध नोंदविण्यासाठी पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कळंबोली या ठिकाणी निदर्शन केली. या वेळी कायदा सुरक्षा राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पनवेल बंदची हाकरायगड रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांनी बुधवारी पनवेल बंदची हाक दिली. नागरिकांनी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवावा, असे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी पनवेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.आंदोलनादरम्यान कायदा हातात घेतल्याने एनआरआय, रबाळे व रबाळे एमआयडीसी येथे चार गुन्हे दाखल आहेत. बुधवारीही शहरात चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी शांतता राखावी. कायदा मोडल्यास कारवाई केली जाईल.- डॉ. सुधाकर पठारे,पोलीस उपआयुक्त 

टॅग्स :newsबातम्या