भुजबळ  तुरुंगात, राणे राज्यातून तडीपार - सुभाष  देसाईंची शिवसेना सोडनाऱ्यांवर टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:57 PM2018-04-07T13:57:41+5:302018-04-07T14:59:05+5:30

शिवसेना संपविण्याची  भाषा करणारे संपले, छगन भुजबळ तुरुंगात गेला. नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार  झाला. गणेश  नाईक घरी बसले असल्याची टीका उद्योगमंत्री  सुभाष  देसाई  यांनी  केली आहे.

Bhujbal Prison Prison Into Rane State - Commentary on Subhash Desai's Sena Leader | भुजबळ  तुरुंगात, राणे राज्यातून तडीपार - सुभाष  देसाईंची शिवसेना सोडनाऱ्यांवर टीका 

भुजबळ  तुरुंगात, राणे राज्यातून तडीपार - सुभाष  देसाईंची शिवसेना सोडनाऱ्यांवर टीका 

Next

नवी  मुंबई  - शिवसेना संपविण्याची  भाषा करणारे संपले,छगन भुजबळ तुरुंगात गेला. नारायण  राणे महाराष्ट्रातून तडीपार  झाला. गणेश  नाईक घरी बसले असल्याची टीका उद्योगमंत्री  सुभाष  देसाई  यांनी  केली आहे. नेरूळ मधील  आगरी  कोळी भवनमध्ये नवी मुंबईतील शिवसेना पदाधिका-यांचा मेळावा आयोजीत  केला होता. यावेळी  सुभाष  देसाई  यांनी भाजपावरही टीका केली.

भाजपाचीच  सत्ता येण्याची भाषा वापरणारे आता एनडीएची सत्ता येणार  अशी भाषा बोलू लागले आहेत. पण शिवसेना स्वबळावरच लढणार हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट  केले आहे. कोणत्याही  स्थितीत  राज्यात शिवसेनेचीच सत्ता येणार असा विश्वास व्यक्त  केला.

नारायण राणेंना शिवसेना  संपविण्याची  भाषा केली  पण तोच महाराष्ट्रातून तडीपार  झाला. हिंदी  व इंग्रजी  शिकण्यात त्याची सहा वर्ष निघून जातील अशी टीकाही  त्यांनी केली. ज्यांनी ज्यांनी  शिवसेनेला अपशकुन करण्याचा प्रयत्न  केला त्यांची राजकीय  कारकीर्द  संपवल्याचे स्पष्ट  केले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ  शिंदे यांनीही  भाजपावर टीका करून राज्यात  शिवसेनेची सत्ता येईल  असा विश्वास  व्यक्त  केला.मेळाव्यास उपनेते विजय नाहटा,  खासदार  राजन विचारे, नवी मुंबई  महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, नामदेव  भगत, विठ्ठल  मोरे उपस्थित होते.

Web Title: Bhujbal Prison Prison Into Rane State - Commentary on Subhash Desai's Sena Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.