मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी, विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:52 PM2020-02-27T23:52:36+5:302020-02-27T23:52:39+5:30
शाळांमध्ये भाषा संवर्धनासाठी शपथ; स्वयंसेवी संस्था, सरकारी कार्यालये, राजकीय पक्षांकडूनही आयोजन
नवी मुंबई : मराठी राजभाषा दिन शहरात उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शहरातील शाळा, स्वयंसेवी संस्था तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आणि उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळमध्ये शाळेच्या माध्यमातून ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते.
ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा केली जातो. या दिनाचे औचित्य साधून विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. नेरु ळ शिरवणे येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५ व शाळा क्र मांक १०१ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाची व दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करण्याची शपथ घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. कार्यक्र माचे आयोजन मुख्याध्यापिका तन्वी सुर्वे व मंगल भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी शिक्षिका रंजना साळी यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा प्रवास व सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली तर वर्तना बांगर यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कलाशिक्षक अमृत पाटील नेरु ळकर यांनी सादर केलेल्या, ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या गीताने कार्यक्र माची सांगता झाली. नेरुळमधील विद्याभवन संकुलाच्या सभागृहामध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला. विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या भाषणातून मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व व इतिहास पटवून दिला. शाळेच्या माध्यमातून ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चकोर शहा, संचालक दिनेश मिसाळ माध्यमिक इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीजा नायर, प्राथमिक इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा मुळीक आदी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेरुळ येथील एन. आर. भगत इंग्लिश स्कूल, एन. आर. भगत ज्युनिअर व सिनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. कार्यक्र माची सुरु वात संस्थेचे संस्थापक नामदेव भगत व मोहन तेली यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्र माच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषण, विविध मराठी गीते गायली, छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचे गायन, वेशभूषा आदी कार्यक्र मांचे सादरीकरण केले. याप्रसंगी मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कोठेकर, वंदना पाटील, कॉलेजचे प्राचार्य सुमित भट्टाचार्य, संस्थेचे खजिनदार अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वाशीतील अंजुमन इस्लाम स्कूलमधील विद्यार्थ्यांनीही मराठी राजभाषा दिन साजरा केला. मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी फलकावर मराठी अक्षरे गिरवली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास सांगत मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. नेरुळमधील शिवसमर्थ सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सेक्टर १६ ए येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदानात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज यांच्या काही कविता रांगोळीतून साकारण्यात आल्या.