नवीन पनवेलमध्ये सायकल मॅरेथॉन
By admin | Published: January 26, 2017 03:36 AM2017-01-26T03:36:24+5:302017-01-26T03:36:24+5:30
पनवेलकरांचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी रविवारी २९ जानेवारी रोजी सायकल मॅरेथॉनचे
पनवेल : पनवेलकरांचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी रविवारी २९ जानेवारी रोजी सायकल मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनचे माध्यम प्रायोजक लोकमत आहे. या सायकल मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले आहे.
महागडी चारचाकी किंवा दुचाकी वाहने चालवून अमूल्य इंधन खर्च करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा सायकल चालवून पर्यावरण रक्षणासाठी मदत होईल व सायकल चालवण्यासारखा दुसरा व्यायाम नाही या उदात्त हेतूने एक अनोखा उपक्र म राबवून प्रदूषणमुक्त पनवेल, आरोग्यदायी पनवेल, स्पर्धा नव्हे ... हे आहे अभियान असे घोषवाक्य घेऊन ‘चला करू या सायकलची रपेट’ असे आवाहन पनवेलकरांना करण्यात आले आहे. रविवारी २९ जानेवारीला सकाळी ८ वाजता दत्त मंदिर, के.आर. बांठिया हायस्कूलजवळ, सेक्टर १३, नवीन पनवेल येथून या मॅरेथॉनला सुरु वात होणार आहे. सायकलिंगमधील आशिया कप गोल्ड मेडलिस्ट अमरीत सिंग या उपक्र माचे उद्घाटन करणार आहेत. सहभागी प्रत्येक सायकलपटूला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रकाने सन्मानित करण्यात येणार असल्याचे संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले. शहरातील धकाधकीच्या जीवनात नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याविषयी जागृतीसाठी उपक्रम राबविला आहे. (वार्ताहर)