महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड

By नारायण जाधव | Published: March 8, 2023 02:22 PM2023-03-08T14:22:25+5:302023-03-08T14:23:29+5:30

नेरुळ विभागामध्ये वीज चोरी व अनधिकृत वापर प्रकरणी २.३१ कोटींची विक्रमी वसुली

Big contribution of women engineer, power theft of crores revealed in Nerul division | महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड

महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड

googlenewsNext

नवी मुंबई : वेगवेगळ्या युक्त्या करून वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध नेरुळ विभागामध्ये मागील वर्षभरामध्ये सातत्याने वीजचोरी विरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहेत. मागील एप्रिल -२०२२ ते जानेवारी- २०२३ पर्यंत नेरुळ विभागामध्ये कलम१३५ अंतर्गत वीजचोरीची एकुण ३०५ प्रकरणे व कलम १२६ अंतर्गत अनधिकृत वीज वापराची एकुण ९० अशी एकुण ३९५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमधून महावितरणने एकुण २.३१ कोटी रुपयांची वसुली केलेली आहे व १९ वीज चोराविरुद्ध प्रकरणी एफआईआर दाखल केलेला आहे. जानेवारी अखेरपर्यंत तब्बल १३००० ग्राहकांची तपासणी करण्यात आली. 

वीजचोरी मोहीम ही नेरुळ विभागामध्ये कार्यकारी अभियंता श्री.सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे प्रत्येक महिन्यामध्ये घेतली जाते. यामध्ये उपविभागीय अधिकारी अंबादे, नानोटे, काळे व सर्व अभियंते जनमित्र, लाईनस्टाफ व सुरक्षा रक्षक सुद्धा सामील होतात. विशेष म्हणजे विभागामध्ये असलेल्या ९ महिला अभियंता या मोहिमेमध्ये भाग घेत असतात. वरील यशामध्ये या महिला अभियंत्याचा मोलाचा वाटा आहे. वीजचोरीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेगा वीजचोरी पकड मोहीम राबविण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यअभियंता धनंजय औढेंकर यांनी दिलेल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार आखण्यात आलेल्या वीजचोरी मोहिमांना नेरुळ विभागात चांगले यश प्राप्त झाले आहे. सध्याचे कार्यरत मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी सुद्धा वीजचोरी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 'वीजचोरीची कीड एक सामाजिक समस्या असून ती समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. कितीही कृत्याकरून ग्राहकाने विजचोरी केली तरी महावितरण ती शोधून काढणारच .तेव्हा सर्व ग्राहकांनी अमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे वीज वापर करावा व विजबिल वेळेत भरावे', असे आवाहन त्यांनी केले आहे.

वीजचोरी विरुद्ध केलेल्या कारवाई मध्ये मिळालेल्या यशासाठी नेरुळ विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मुख्य अभियंता, भांडुप परिमंडल सुनील काकडे,  व अधीक्षक अभियंता, वाशी मंडळ माने  यांनी अभिनंदन केले.
 

Web Title: Big contribution of women engineer, power theft of crores revealed in Nerul division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.