‘सिडको’मध्ये मोठी भरती, ८१ हजारांपर्यंत पगार; अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी अंतिम मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:03 PM2023-12-11T12:03:27+5:302023-12-11T12:03:44+5:30

सिडको महामंडळातील  लेखा लिपिक पदाच्या २३ रिक्त जागा भरण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

Big recruitment in 'CIDCO', salary up to 81 thousand; January 8 deadline for application | ‘सिडको’मध्ये मोठी भरती, ८१ हजारांपर्यंत पगार; अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी अंतिम मुदत

‘सिडको’मध्ये मोठी भरती, ८१ हजारांपर्यंत पगार; अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी अंतिम मुदत

नवी मुंबई :सिडको महामंडळातील  लेखा लिपिक पदाच्या २३ रिक्त जागा भरण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ९ डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी २०२३ ही अंतिम मुदत असणार आहे.

लेखा विभागातील लेखा लिपिकाच्या २३ जागा मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी ही बाब लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात लेखा लिपिकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता बी.कॉम, बीएमएस आदी विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. विविध आरक्षण प्रवर्गातील महिलांसाठी ८ जागा आरक्षित आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी या भरती प्रक्रियेत आरक्षण देण्यात आले आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० इतके वेतन मिळणार आहे.

Web Title: Big recruitment in 'CIDCO', salary up to 81 thousand; January 8 deadline for application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको