पनवेल : रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत खारघर शहरात खारघर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाइक रॅलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या रॅलीत १५० दुचाकी चालक सहभागी झाले होते. लोकमत हे या कार्यक्र माचे माध्यम प्रायोजक होते. मराठी सिनेअभिनेते कश्यप परु ळेकर यांची या कार्यक्र माला प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत रस्त्यावर दुचाकी चालवत असताना अनेक जण हेल्मेट घालणे टाळत असतात, मात्र हे आपल्या जीवावर बेतू शकते त्यामुळेच हेल्मेट घालणे गरजेचे आहे, यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी खारघर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे म्हणाले की, ९९ टक्के अपघात हे नियमाचे पालन न केल्यामुळे होतात, त्यामुळे सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे यामुळे आपलेच जीवन सुखकर होईल. वाहतूक पोलीस तुमचे मित्र आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्र माला उपस्थित असलेले सिनेअभिनेते कश्यप परु ळेकर म्हणाले की, खारघरमध्ये आयोजित केलेल्या या बाइक रॅलीमुळे समाजात नक्कीच जनजागृती होईल. २८ वर्षांपासून वाहतूक पोलीस रस्ता सुरक्षा अभियान राबवत असतात. या अभियानात मोठ्या प्रमाणात वाहतुकीसंदर्भात जनजागृती केली जाते, ही चांगली बाब आहे. या वेळी उपस्थितांमध्ये विना सामाजिकी संस्थेच्या उमा कुसगुडे, अश्विनी शिरोडकर, खारघर जिमखान्याचे अध्यक्ष गुरु नाथ गायकर, सचिन पाटील, बिना गोगरी, राधा मेहता, तृप्ती पगडे, इंदुमती, अभिजित मुंडकल, डॉ. स्वप्नील पवार, चेतन डोईफोडे आदींसह मोठ्या प्रमाणात खारघरमधील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी )
खारघर शहरामध्ये बाइक रॅली
By admin | Published: January 26, 2017 3:36 AM