- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल-सायन महामार्गाच्या अगदी बाजूला असलेल्या सिडकोच्या पाणी साठवून ठेवणाऱ्या धारण तलावा लगत पुन्हा बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात आले आहे. नऊ महिन्यांनंतर ही दुसरी घटना असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. अज्ञात व्यक्तीकडून वारंवार औषधे उघड्यावर फेकली जात आहे. यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकंकडून होत आहे.औषधी व घातक कचरा रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी टाकला जात नाही. त्याची विल्हेवाट अतिशय योग्य प्रकारे लावावी लागते. माणसाच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणासाठीही हा कचरा धोकादायक असतो. त्यामध्ये औषध आणि दवाखान्यात वापरलेले सलाइन, सुया, सिरिंज, हँड ग्लोव्ज, शिवाय इतर गोष्टींचा सामावेश आहे. हा कचरा हा वेगळा करणे बंधनकारक आहे. तशा अटीवरच हॉस्पिटल, छोटे दवाखाने यांना तालुका आरोग्य विभाग करून परवानगी दिली जाते. महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडूनही बायोमेडिकल वेस्ट हा वेगळा करण्याबाबत सूचना त्या रुग्णालयाबरोबरच, मेडिकल आणि औषध कंपन्यांना दिल्या जातात. पनवेल आणि सिडको कॉलनीमध्ये अनेक दवाखाने आहेत, तसेच मेडिकल आणि रक्त लघवी तपासणी बरोबरच एक्स-रे, एमआरआय, सिटीस्कॅन, सोनोग्राफी केंद्राचा समावेश असतो. वेगवेगळ्या रुग्णांचे आॅपरेशन या ठिकाणी केली जातात. त्यासाठी उपकरणे वापरली जातात. यापैकी वापरलेल्या वस्तू, तसेच औषध आणि वापरायोग्य नसलेल्या इतर मेडिकल अनेकदा रस्त्यावर आणि सार्वजनिक भागात फेकून दिले जाते.बायोमेडिकल वेस्ट उचलण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे काम देण्यात आले आहे. या कंपनीची गाडी दररोज पनवेल परिसरात येते आणि बायोमेडिकल वेस्ट होऊन जाते. त्याबाबत नोंदवह्या ठेवण्यात येतात, तसेच या कचºयाची वाहतूक, तसेच त्याचे डिस्पोजल करण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला पैसे द्यावे लागतात. ते वाचविण्याकरिता काही रुग्णालये, मेडिकल्स आणि औषधे, गोळ्या आणि इतर मेडिकल वस्तू रस्त्यावर फेकून देतात.धारण तलावात वारंवार टाकला जातो कचराकळंबोलीत सेक्टर ३ ई येथे, तसेच केएलई कॉलेजच्या समोर पावसाचे पाणी साठवून ठेवणारा जलधारण तलाव आहे. येथे सोमवारी बायोमेडिकल वेस्ट म्हणजेच औषधांचे सात ते आठ बॉक्स टाकून देण्यात आले आहे. त्यामध्ये औषधे, लिक्विड, हँड ग्लोव्ज आणि इतर गोळ्यांचा समावेश आहे. या आगोदर २८ नोव्हेंबर, २०१९ रोजी, त्यानंतर ४ जानेवारी, २०२० रोजी हा कचरा टाकण्यात आला होता.याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसारित करताच पालिका कर्मचारी या जागेची साफसफाई करतात. पुन्हा काही महिने गेल्यानंतर याच ठिकाणी परत औषधे, गोळ्या, हातमोजे, इंजेक्शन, सुया आणून टाकल्या जातात. टाकणाºयावर कारवाई मात्र होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कळंबोली जलधारण तलावाच्या जवळ पुन्हा बायोमेडिकल वेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:39 PM