कळंबोली : पनवेल-सायन महामार्गाच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या पाणी साठवून ठेवणाऱ्या धारण तलावालगत पुन्हा बायोमेडिकल वेस्ट टाकल्याचे उघड झाले आहे. महिनाभरात ही दुसरी घटना आहे. मात्र, संबंधितांवर कठोर कारवाई होत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. एमआरकडून (मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह) ही औषधे उघड्यावर फेकली जात असल्याचे अंदाज व्यक्त केले जातात.घरात निर्माण होणारा घनकचरा हा घंटागाडीत टाकला जातो. त्यातील पुन्हा वापरात येणाºया वस्तू बाहेर काढून उरलेला कचरा डम्पिंग ग्राउंडवर नेला जातो. घातक कचºयाचीही योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे.महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडूनही बायोमेडिकल वेस्ट वेगळा करण्याबाबत सूचना रुग्णालयाबरोबरच, मेडिकल आणि औषध कंपन्यांना दिल्या जातात. मात्र, तसे होताना दिसत नाही.कळंबोलीत सेक्टर ३ ई येथे तसेच केएलई कॉलेजच्या समोर पावसाचे पाणी साठवून ठेवणारा जलधारण तलाव आहे. येथे शनिवारी बायोमेडिकल वेस्ट म्हणजेच औषधांचे सात ते आठ बॉक्स फेकण्यात आले आहेत. त्यामध्ये औषध, लिक्विड, हॅण्ड ग्लोज आणि इतर गोळ्यांचा समावेश आहे. २८ नोव्हेंबरलाही परिसरात बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात आले होते. आता गवतामध्ये ते फेकून देण्यात आले आहेत.
कळंबोलीतील तलावालगत पुन्हा बायोमेडिकल वेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 1:16 AM